शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांना नोटीस

By admin | Updated: October 6, 2015 00:32 IST

स्वाइनची धास्ती : महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित

सांगली : स्वाइन फ्लूबाबत शहरातील खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती महापालिकेला प्राप्त होत नाही. त्यासाठी आता पालिकेच्या आरोग्य विभागाने ३५० खासगी रुग्णालयांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे. महापौर विवेक कांबळे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची बैठक घेऊन, हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला. महापौर कांबळे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. महापालिका क्षेत्रात १७ स्वाइन फ्लूचे रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दहा स्वाइन फ्लूसदृश रूग्णांवर उपचार झाले आहेत. महापालिका क्षेत्रात पहिला स्वाइन फ्लूचा रूग्ण तीन सप्टेंबरला आढळून आला. तो एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेला होता. मात्र संबंधित डॉक्टरांनी याची माहिती महापालिकेला दिली नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी केला. यामुळे आता महापालिका क्षेत्रातील ३५० खासगी रूग्णालयांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. (प्रतिनिधी)माजी पदाधिकाऱ्याची मुलगी व पुतण्या संशयितमहापालिकेच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलीला व पुतण्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या रूग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही.मृत महिलेस ‘स्वाइन’ची लागणचार दिवसांपूर्वी मृत झालेल्या संजयनगर येथील सुनीता कोळपे या महिलेस ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाली होती, असा अहवाल शासकीय रुग्णालय प्रशासनास सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे, अशी माहिती स्वाइन फ्लू कक्ष अधिकारी सदाशिव व्हण्णणावर यांनी दिली. चार दिवसात एकही नवीन रुग्ण नाहीगेल्या चार दिवसात एकही नव्याने संशयित रुग्ण दाखल झालेला नाही. याशिवाय गेल्या चार दिवसांपासून दाखल असलेल्या दोन रुग्णांच्या रक्त तपासणीचा अहवालही मिळाला आहे. यामध्ये इनामधामणी (ता. मिरज) व राजोबाचीवाडी (ता. जत) येथील दोन रुग्णांना स्वाइनची लागण झाली आहे.