शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षे नव्हे, ... ‘गुलकंद्राक्षे’ म्हणा!; गुलकंद आणि करवंदाचा स्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 06:44 IST

द्राक्ष उत्पादनात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेले सांगलीकर द्राक्षातून चांगले उत्पन्न घेत आहेत. हमखास उत्पादनाचे इंगित सापडल्यानंतर काही द्राक्षगुरूंनी वेलींवर कलमे करत वेगवेगळ्या जातींची पैदास सुरू केली.

- संतोष भिसेलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दर्जेदार द्राक्षे उत्पादनाची नस सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता त्यातही थक्क करणारे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. वाढत्या स्पर्धेचा दरावर परिणाम होतो, त्यामुळे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पकता शेतकरी दाखवत आहेत. यातूनच चक्क सुगंधी द्राक्षांचे वाण विकसित झाले आहे. ही द्राक्षे खाल्ल्यानंतर जिभेवर गुलकंद आणि करवंदाचा स्वाद पसरतो. ही ‘गुलकंद्राक्षे’ चर्चेची आणि कुतूहलाची ठरली आहेत.

द्राक्ष उत्पादनात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेले सांगलीकर द्राक्षातून चांगले उत्पन्न घेत आहेत. हमखास उत्पादनाचे इंगित सापडल्यानंतर काही द्राक्षगुरूंनी वेलींवर कलमे करत वेगवेगळ्या जातींची पैदास सुरू केली. त्यातूनच खास सांगलीच्या अशा काही जाती देशभरात नावारूपाला आल्या. हटके काहीतरी करण्याच्या महत्त्वाकांक्षेतूनच मणेराजुरी (ता. तासगाव) येथे सुगंधी द्राक्षांची बाग फुलवली.सुरुवातीला यासाठीच्या द्राक्षकाड्या केरळमधून आणल्या. उर्वरित सर्व लागवड, खत-पाणी, औषधे मात्र स्थानिकच आहेत. 

बिया औषधी गुणधर्माच्याnपुणे जिल्ह्यात सुगंधी द्राक्षांचा प्रयोग झाला होता; पण ती चेरीच्या आकाराची होती. सांगलीतील द्राक्षे मात्र मोठ्या आकाराची व रसाळ आहेत. nद्राक्षप्रेमींची पसंती बिनबियांच्या द्राक्षांना असली तरी, सुगंधी द्राक्षे मात्र बियांची आहेत. या बिया औषधी गुणधर्माच्या असल्याचा दावा केला जातो. nद्राक्षांना चारपट जास्त दरही मिळाला. पाहता-पाहता विकली गेली. जानेवारीमध्ये बाग संपली.!nव्यावसायिक स्पर्धा टाळण्यासाठी या शेतकऱ्याने वाणाचा फारसा गाजावाजा केला नाही; पण स्वत:च्या नावाने उत्पादन बाजारात आणले. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्याने माहिती दिली. 

खाताक्षणी जिभेवर संमिश्र स्वादही द्राक्षे काळ्या रंगाची आहेत. शेतकऱ्याने स्वत:च्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून त्याचे नामकरण केले आहे. ती खाताक्षणी जिभेवर संमिश्र स्वाद पसरतो. काही क्षणांतच लक्षात येते, अरे हा तर गुलकंद! अर्थात, त्यामध्ये काहीसा डोंगरी करवंदांचा स्वादही मिसळला आहे.