शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

जतचे नऊ नगरसेवक अपात्र

By admin | Updated: July 23, 2014 22:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : स्थगितीसाठी प्रयत्न

जत : जत नगरपालिकेच्या नऊ नगरसेवकांनी वेळेत खर्चाचा तपशील दिला नाही म्हणून जिल्हाधिकारी सांगली यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे. यामध्ये एका स्वीकृत सदस्याचा समावेश आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमुळे सत्ताधारी वसंतदादा विकास आघाडीत खळबळ माजली आहे.डिसेंबर २०१२ मध्ये जत नगरपालिकेची निवडणूक झाली. यावेळी नगरसेवक इकबाल गवंडी, श्रीकांत शिंदे, मनोहर पट्टणशेट्टी, शुभांगी बन्नेनवार, नंदा कांबळे, माया साळे, लीलाबाई कोळी, संगीता माळी व स्वीकृत नगरसेवक सुजय शिंदे यांनी एक दिवस उशिरा खर्च सादर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी या नऊजणांना कारणे दाखवा नोटीस देऊन म्हणणे मागवून घेतले होते; परंतु त्यांचा खुलासा समाधानकारक नसून, ते निवडणूक नियमाला धरून नाही. त्यामुळे तुमचे नगरसेवक पद रद्द ठरविण्यात येत आहे, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला.नगरपालिकेत बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे गटाची सत्ता असून, ते माजी मंत्री मदन पाटील समर्थक आहेत. त्यांचे आठ नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकांची मदत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आहे.राष्ट्रवादीच्या तीनपैकी एक उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांचा प्रचार केला म्हणून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करुन तो मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे सध्या उपनगराध्यक्षपद रिक्त आहे.सत्ताधारी गटाचे नेते सुरेश शिंदे यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे ऐनवेळी इतरांची मदत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला न्यायालयातून किवा नगरविकास विभागातून स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (वार्ताहर)