शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दूधसागर धबधबा येथे निजामुद्दीन एक्स्प्रेसवर दगडफेक

By admin | Updated: July 14, 2015 00:42 IST

बोगीच्या काचा फुटल्या : संतप्त प्रवाशांचा मिरजेत गोंधळ

मिरज : लोंढा रेल्वेस्थानकाजवळ दूधसागर धबधबा येथे गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित बोगीत घुसू दिले नसल्याच्या कारणावरून जमावाने एसी बोगीवर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यामुळे या बोगीतील संतप्त प्रवाशांनी मिरजेत एक्स्प्रेस रोखून गोंधळ घातल्याने एक्स्प्रेसला एक तास विलंब झाला. रविवारी सायंकाळी गोव्यातून मिरजेकडे येणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस कॅसलरॉक स्थानकाच्या अलीकडे दूधसागर धबधब्याजवळ थांबल्यानंतर रेल्वेत प्रवाशांचा लोंढा घुसला. रविवारच्या सुटी दिवशी बेळगाव परिसरातून मोठ्या संख्येने तरुण धबधबा परिसरात पर्यटनासाठी आले होते. मात्र, बेळगावकडे परत जाण्यासाठी निजामुद्दीन एक्स्प्रेस ही एकच रेल्वेगाडी असल्याने हजारो प्रवासी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूस थांबले होते. एक्स्प्रेसच्या सामान्य बोगीसह आरक्षित बोगीतही प्रवासी खचाखच भरले. वातानुकूलित बोगीत प्रवासी घुसू नयेत यासाठी बोगीतील प्रवाशांनी दरवाजे बंद केले होते. दरवाजे उघडण्यासाठी जमावाने आरडाओरडा करीत पुढील बाजूच्या एसी टु-टायर बोगीवर तुफान दगडफेक केली. दगडांच्या वर्षावातच चालक डब्ल्यू. टी. वर्णावत यांनी गाडी बेळगावच्या दिशेने नेली. दगडफेकीत एसी बोगीच्या आठ खिडक्यांच्या काचा फुटल्याने रेल्वेचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने दगडफेकीत कोणीही प्रवासी जखमी झाला नाही. एसी बोगीच्या काचा फुटल्याने वातानुकूलन यंत्रणा बंद पडली. रेल्वेचालकाने लोंढा स्थानकावर याबाबत माहिती दिल्यानंतर मिरज स्थानकातील दुरुस्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. दगडफेकीच्या घटनेमुळे व वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने संतप्त झालेल्या एसी बोगीतील प्रवाशांनी मिरजेत गाडी आल्यानंतर गोंधळ घातला. गाडी रोखून तातडीने एसी बोगी बदलण्याची मागणी केली. एकदा गाडीचा रेक तयार झाल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता या कारणास्तव त्यात बदल करण्याचा किंवा बोगीच्या अदलाबदलीचा अधिकार स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना नसल्याने मिरजेत रेल्वे अधिकाऱ्यांनी एसी बोगीच्या फुटलेल्या काचांना चिकटपट्ट्या लावून तात्पुरती मलमपट्टी करीत वातानुकूलन यंत्रणा सुरू केली. त्यानंतर तब्बल एक तासाच्या विलंबानंतरनिजामुद्दीन एक्स्प्रेस मिरजेतून रवाना करण्यात आली. (वार्ताहर)