शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वडगावच्या माळावर द्राक्षाचे नवीण वाण विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

दत्ता पाटील लाेकमत न्यूज नेटवर्क तासगाव : तासगाव तालुक्यातील वडगावच्या माळरानावर विजय देसाई यांनी देशातील सर्वांत लांब मणी असणाऱ्या ...

दत्ता पाटील

लाेकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : तासगाव तालुक्यातील वडगावच्या माळरानावर विजय देसाई यांनी देशातील सर्वांत लांब मणी असणाऱ्या द्राक्षाचे नवीन वाण विकासित केले आहे. त्याच्या पेटंटसाठी एनआरसीकडे प्रस्ताव दिला असून सहा ते साडेसहा सेेंटिमीटर लांब मण्यांमुळे या द्राक्षांना देशभरात मागणी आहे. या नवीन वाणाच्या चार किलोच्या पेटीला ४५१ रुपये दर मिळाला. लवकरच या वाणाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.

तासगावमधील द्राक्ष बागायतदारांच्या संशोधक वृत्तीला चालना देणारा नावीन्यपूर्ण प्रयोग राबवत नवीन वाण विकसित करण्याची किमया देसाई यांनी केली आहे. त्यांनी रसायनशास्त्रात बी.एस्सी.ची पदवी घेतली असून, १९९३ मध्ये वडिलोपार्जित माळरानावर ‘माणिक चमन’ जातीची लागण केली. सात वर्षांपूर्वी सुपर व्हरायटी असणाऱ्या द्राक्षबागेतील एका वेलीवर इतर द्राक्षांच्या तुलनेत मण्यांचा वेगळा आकार असणारे घड दिसून आले. देसाईंनी या वेलीवरील काड्या काढून नवीन द्राक्षबागेत त्या भरल्या. त्यानंतर त्या वेलींवर आलेली द्राक्षेही लांब मण्याची होती. सात वर्षांपासून सातत्याने प्रयोग करून आज त्यांनी साडेतीन एकरावरील या नवीन वाणाची द्राक्षे बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. सुमारे चार हजार झाडे आहेत. गेल्यावर्षी मुंबई बाजारात चार किलोच्या पेटीला ५०१ रुपये दर मिळाला होता. यावर्षी सर्वच द्राक्षांना अपेक्षित दर नाही. तो १५० ते २०० रुपये असताना, देसाई यांच्या नवीन वाणाची ४५१ रुपयांनी विक्री झाली आहे. राजकोट, बांगलादेश, दिल्ली, मुंबई बाजारात यावर्षी द्राक्षे पाठविण्यात आली आहेत. त्यांना मोठी मागणी आहे.

देशात सर्वांत लांब मण्यांचे वाण असल्याचा दावा देसाई यांनी केला असून, पेटंटसाठी प्रस्ताव सादर केला आहे. सांगली, नाशिक, जालन्यासह द्राक्ष पट्ट्यातील शेतकरी आणि संशोधक भेटी देऊन माहिती घेत आहेत.

कोट

नवीन वाणाला पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या द्राक्षांना मोठी मागणी असून अन्य जातींच्या तुलनेत जास्त फायदा देणारी जात आहे. या नवीन वाणाचे नाव जाहीर करून लवकरच द्राक्ष बागायतदारांसाठी ते उपलब्ध करून देणार आहे.

- विजय देसाई, द्राक्ष उत्पादक.

चौकट

नवीन वाणाची वैशिष्ट्ये

मण्याची लांबी सर्वाधिक सहा ते साडेसहा सेंटिमीटर

दिसायला अत्यंत आकर्षक

पानांची रूंदी जास्त

कूज आणि गळ होत नाही

अन्य द्राक्षांच्या तुलनेत दहा दिवस आधी मालाची काढणी शक्य

रोगप्रतिकारक क्षमता चांगली

दुप्पट ते तिप्पट दर