शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

जिल्हा बँकेकडून नव्या योजनांची बरसात

By admin | Updated: October 20, 2015 23:51 IST

कर्ज मर्यादेत वाढ : संत्री, मोसंबी, झेंडू, शेवगा उत्पादनालाही मिळणार कर्ज

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजनांची बरसात आगामी वर्षासाठी करण्यात आली. तांत्रिक समितीच्या बैठकीत पीक कर्जाच्या मर्यादेत मोठ्या प्रमाणावर वाढ करणे, नव्या पिकांचा कर्जपुरवठ्यात समावेश करणे, कर्जदार शेतकऱ्यांचा विमा उतरविणे, वाहन कर्जाची मर्यादा वाढविणे अशा अनेक योजनांची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पाटील म्हणाले की, संपर्क अभियानात सभासद शेतकऱ्यांनी पीक कर्जवाटपाबाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करतानाच त्यांच्यासाठी नव्या योजना अंमलात आणण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामध्ये चालू वर्षाच्या तुलनेत २0१६-१७ साठीच्या कर्जमर्यादेत मोठी वाढ केली आहे. अनेक पिकांच्या कर्जमर्यादेत दुप्पट, दीडपट वाढ झाली आहे. ज्या पिकांचा समावेश कर्जवाटप धोरणात नव्हता, त्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला प्रोत्साहन व बळ देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होणार आहे. पिकांच्या यादीत वाढ झाली असून पुढील आर्थिक वर्षापासून झेंडू, शेवगा, संत्री, मोसंबी या पिकांनाही बँक कर्जपुरवठा करणार आहे. वाहन कर्जाच्या मर्यादेतही मोठी वाढ केली आहे. वाहनाच्या मूळ किमतीवर ७५ टक्के कर्जपुरवठा यापूर्वी केला जात होता. आता दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी ९0 टक्के कर्जपुरवठा केला जाणार आहे. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, नाबार्डचे अधिकारी एन. शिवकुमार, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे आर. आर. सूर्यवंशी, तज्ज्ञ शेतकरी प्रशांत पाटील, ईश्वर पवार, शंकर पाटील, रवी पाटील, संभाजी बोराडे, राज्य सहकारी बँकेचे तपासणीस एस. के. पाटील, कृषी अधिकारी आर. जे. भोसले, वसंतदादा व राजारामबापू साखर कारखान्याचे शेती अधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पदांचा नवा आराखडाजिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील नोकरभरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. नाबार्डच्या सूचनेप्रमाणे पदांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. खेळते भांडवल, शाखानिहाय उलाढाल आदी निकषांवर आधारित आराखड्याअंतर्गत एकूण १ हजार ५३० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या बॅँकेत १ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आराखडा मंजूर झाल्यानंतर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी विमासोसायटी सभासद असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना उतरविण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या बँकेचे एकूण १ लाख ६१ हजार ५४९ सभासद शेतकरी आहेत. या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. विम्यापोटी भरावी लागणारी रक्कम बँक भरणार आहे. नव्या पिकांना कर्जसंत्री व मोसंबीसाठी हेक्टरी ७0 हजार, झेंडूसाठी हेक्टरी ३४ हजार, तर शेवग्यासाठी १ लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनसजिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढविताना बॅँकेने यंदा ८.३३ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या कर्मचाऱ्यांमधून या निर्णयाबद्दल स्वागत होत आहे.