वाळवा : जगभरातील जैवविविधतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत लोकनेते मोहनराव कदम अॅग्री कॉलेज कडेगावचे प्राचार्य डॉ. डी. एम. सावंत यांनी व्यक्त केले.क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा आणि विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे आयोजित दोन दिवसांच्या ‘जैवविविधता पर्यावरणातील बदल व शाश्वत विकास’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर होते. व्यासपीठावर तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. पी. जी. भवाने, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, चिखली नाईक कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. एम. व्ही. संथाकुमार, डॉ. एम. आर. आबदार प्रमुख उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विश्वास सायनाकर म्हणाले, विज्ञान हे प्रत्येकाला आवश्यक असल्याने महाविद्यालयात देखील कला-वणिज्यशाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देणे आवश्यक आहे.याप्रसंगी संशोधक डॉ. रमेश गेजगे, आर. वाय. जगताप, डॉ. एस. एस. पाटील, प्रा. रेश्मा महापुरे यांचा, परिषद सहभाग व विशेष लेख अंकातील लेखन केल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्वच सहभागी संशोधकांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. रमेश गेजगे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांनी स्वागत केले. प्रा. ए. व्ही. पन्हाळे यांनी परिषदेचा वृत्तांत सांगितला. प्रा. डॉ. के. खंदारे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. के. आर. जाधव, प्रा. डॉ. जे. पी. कांबळे, प्रा. बी. एन. मिसाळ, प्रा. एम डी. जामदार, प्रा. डी. एच. जाधव, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. आर. आर. सावंत, डॉ. एन. एस. पाटील, प्रा. कु. एस. एस. कदम, प्रा. जे. आर. साळुंखे यानी संयोजन केले. (वार्ताहर) कीटकांची संख्या वाढतेयडॉ. सावंत म्हणाले, जैवविविधतेमुळे जमीन, हवा, पाणी यांचा चांगला परिणाम होतो. निसर्गात वाढत असणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवता येते. वाढते शहरीकरण; औद्योगिकरण, यातून निर्माण होणारे प्रदूषण यांच्यामुळे वातावरणात बदल होत आहे. त्याचा परिणाम म्हणून कीटकांची संख्या वाढत चालल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जैवविविधतेचा अभ्यास गरजेचा
By admin | Updated: August 30, 2015 22:41 IST