शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे १६ कोटी केंद्र शासनाकडे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:10 IST

सांगली : वेळेत कर्जाची परतफेड करून व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८०८ शेतकºयांचे १६ कोटी ३९ लाख रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. शेतकºयांची ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.शेतकºयांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्जाचा नियमितपणे ...

सांगली : वेळेत कर्जाची परतफेड करून व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८०८ शेतकºयांचे १६ कोटी ३९ लाख रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. शेतकºयांची ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.शेतकºयांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्जाचा नियमितपणे पुरवठा केला जातो. २०१५ ते २०१७ या दोन आर्थिक वर्षांच्या कालावधित पीक कर्ज घेऊन १ लाख २४ हजार ८०८ शेतकºयांनी वेळेत परतफेड केली होती. त्यामुळे ते व्याज परताव्यासाठी पात्र ठरले. मार्च २०१८ मध्ये व्याज परताव्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही.ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळीसह अन्य पिकांसाठी बँकेकडून अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करण्यात येतो. जिल्हा बँकेकडून विकास सोसायटीच्या माध्यमातून देण्यात येणाºया पीक कर्जावर सहा टक्के व्याज आकारणी होते. कर्ज परतफेड करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असते. मुदतीत कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांना केंद्र आणि राज्य सरकारकडून व्याज परतावा दिला जातो.केंद्र शासनाकडून ३ टक्के सवलत मिळते. २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षातील पात्र शेतकºयांची १६ कोटी ३९ लाख ७० हजार रुपयांची व्याज परताव्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील ५७ हजार २७ शेतकºयांचे ३ टक्क्यांप्रमाणे ८ कोटी ८४ लाख ६५ हजार आणि २०१६-१७ मधील ६७ हजार ७८१ शेतकºयांचे ७ कोटी ५५ लाख पाच हजार रुपयांच्या व्याज परताव्याची रक्कम केंद्राकडे अडकली असल्याचे स्पष्ट झाले.शून्य व्याजदराने पडते पीककर्जसोसायटीमध्ये नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना केंद्र शासनाकडून पीक कर्जावर ३ टक्के व्याज परतावा दिला जातो. याशिवाय राज्य सरकारकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून एक टक्का व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळते. तसेच एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जाला दोन टक्के व्याज आकारणी केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून व्याज परतावा मिळाल्यानंतर जिल्हा बँक तो शेतकºयांच्या खात्यावर जमा करते.शेतकºयांसमोर अडचणीकेंद्राकडील पैसे अडकले असताना, राज्य शासनाकडून देण्यात येणाºया हिश्श्याचा व्याज परतावा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे. संबंधित सभासदांच्या खात्यावर त्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत. मात्र केंद्र शासनाकडील रक्कम न मिळाल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे व्याज परताव्याची रक्कम तात्काळ मिळणे गरजेचे आहे.