शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

विटा बाजार समितीत राष्ट्रवादीची ‘महायुती’

By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST

निवडणूक : युतीतील नाराज, शेतकरी संघटना, रिपाइं, समतावादी महासंघाचा समावेश

विटा : खानापूर व कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षांची महायुती झाली असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी अ‍ॅड. मुळीक यांनी केली. यावेळी खानापूर सूतगिरणीचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे नेते मोहनराव यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय विभुते, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, शेतकरी संघटनेचे रामभाऊ कणसे, नवनाथ पोळ, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, समतावादी महासंघाचे काकासाहेब ऐवळे, भाजपचे अमोल खामकर आदी उपस्थित होते. विटा बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी प्रस्थापितांनी त्यांच्या कार्यकाळात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने, बाजार समितीच्या विकासासाठी समविचारी पक्षांची महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. मुळीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची युती झाली आहे. त्यामुळे अ‍ॅड. मुळीक यांनी जुनी शिवसेना, जुनी भाजप, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, शेतकरी सेना, रिपाइं, समतावादी महासंघ यांच्यासह अन्य समविचारी पक्षांची मोळी बांधल्याचे सांगितले.ते म्हणाले की, २००१ ते २००६ ची बाजार समितीची निवडणूक नेतेमंडळींनी बिनविरोध केली होती. परंतु, त्यानंतर पदाधिकारी निवडी व कामकाजासाठी मार्गदर्शन करण्यास ही नेतेमंडळी कधीच एकत्रित आली नाहीत. त्यामुळे बाजार समिती विकासापासून वंचित राहिली. संजय विभुते म्हणाले की, शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष अन्य राजकीय पक्षांना सोबत न घेता एकत्रित आले, तर आम्हीही आ. अनिल बाबर यांच्या पाठीशी राहू, पण कॉँग्रेसमधील मोहनराव कदम गटाला सोबत घेऊन युती केल्यास जुन्या शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी महायुतीत सहभागी होतील. पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड यांनी दूरध्वनीवरून, भाजपचा जुना गट अ‍ॅड. मुळीक यांच्या महायुतीत सहभागी असल्याचे सांगितले. त्यामुळे मुळीक यांच्या नेतृत्वाखालील महायुतीवर शिक्कामोर्तब झाले. (वार्ताहर)...तरच अनिल बाबर यांच्या पाठीशीनिवडणुकीसाठी आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांची युती झाली आहे. यामुळे सेना व भाजपमधील जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. इतर पक्षांना बरोबर न घेता केवळ सेना-भाजप एकत्र आले तर आ. बाबर यांच्या पाठीशी उभे राहू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.