शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा कारभार खासदारांच्या इशाऱ्यावर

By admin | Updated: September 16, 2016 23:42 IST

राजकीय कुस्ती : महादेव पाटील यांचा आरोप

तासगाव : तासगावच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीच्या एका स्वघोषित नेत्याच्या सांगण्यावरुन अर्ज मागे काढून घेण्यात आला आहे. पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची नुरा कुस्ती सुरु असून तासगावची राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून खासदार संजयकाका पाटील यांच्या इशाऱ्यावर सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता असताना काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. त्यावेळी राष्ट्रवादीतील एका स्वयंघोषित नेत्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या दावणीला बांधले. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता घालवायचे काम केले. तेव्हापासून तासगावातील राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांच्यामार्गे खासदार संजयकाका पाटीलच चालवत आहेत, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. नगराध्यक्ष निवडीवरुन खासदारांचा पक्षातील वचक संपल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यातील ठेकेदार लॉबी, दोन नंबर धंदेवाले मोठे झाले आहेत. पहिल्या नगराध्यक्षाची डिजिटल काढण्याआधीच दुसऱ्या नगराध्यक्षाची निवड केली आहे. भाजपमध्ये पदांचा बाजार मांडला आहे. शहराच्या विकासाचा खेळखंडोबा मांडला आहे. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच मतपेटीतून देईल, असा इशाराही यावेळी महादेव पाटील यांनी दिला. (वार्ताहर)नेत्याची सेटलमेंट खासदार संजयकाका पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील शहरातीलच एका स्वयंघोषित नेत्याचे सेटलमेंटचे राजकारण सुरु आहे. याच नेत्याने राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची पालिकेतील सत्ता घालवण्याचे काम केले. पक्षादेशाचा आव आणून नुरा कुस्तीचा खेळ खेळला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केला.