शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीला ग्रामसभेचे स्वरूप

By admin | Updated: May 18, 2016 00:06 IST

आटपाडीत वादावादीचे प्रकार : केवळ चर्चाच; मूलभूत प्रश्नांना बगल

आटपाडी : भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या तालुक्यात खासदार संजय पाटील यांनी टंचाई निवारणाची आढावा बैठक घेतली खरी. पण खासदार पाटील यांच्या या पहिल्या बैठकीची अक्षरश: ग्रामसभा झाली. अधिकाऱ्यांच मनमानी खाबूगिरी यासह राजकारणातून अधिकाऱ्यांचा अन्यायाचा पाढा अनेकांनी अतिशय संतप्त होत मांडला. अनेकवेळा वादावादी झाली. दोन तास बैठक हाऊनही लोकांचे प्रश्न संपले नाहीत आणि बैठकीत एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. खासदार संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सचिन इथापे, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, भारत पाटील उपस्थित होते.बैठकीस अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. बैठकीत टेंभू योजनेचे पाणी हा कळीचा मुद्दा ठरला. आटपाडी तलावातील पिण्यासाठी आरक्षित केलेले ६२ दशलक्ष घनफुट पाणी पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. पवार यांनी पैसे घेऊन अक्षरश: विकले. त्यामुळे आटपाडीकरांना गाळमिश्रित पाणी प्यावे लागत आहे. यावर वृत्तपत्रांनी वृत्त दिले, तर पवार यांनी त्यांची टिंगल केली.त्यांना विचारणा केली तर ते आम्ही पाण्याचे मालक आहोत, आमचं पाण्याचं दुकान आहे असे म्हणतात. त्यांनी आम्ही पितो ते पाणी पाणी प्यावे, यासह पवारांवर अशोक लवटे, नौशाद तांबोळी, राजेंद्र खरात यांच्यासह अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केली.यावर खासदार पाटील म्हणाले, अभियंता पवार यांनी पावसाचे पाणी सोडून दिले. तुमचा राग रास्त आहे. अकांडतांडव करू नका. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलंय. पवार इथं फार दिवस राहणार नाहीत अशी मी व्यवस्था करतो. यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पण विशेष म्हणजे अभियंता पवार हसले! पवार यांच्या निर्लज्जपणावरही अनेकांनी हल्लाबोल केला.यावेळी सभापती सौ. सुमन देशमुख, भागवत माळी, महिपती पवार, तहसीलदार अजितसिंह पाटील, संजूकुमार सावंत, बळी मोरे, माजी सभापती अलका भोसले, आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, बंडोपंत देशमुख, स्नेहजित पोतदार यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)तलाव भरून घेऊ : ‘टेंभू’ची कामे मार्गी लावू२०१७ पर्यंत २२ टीएमसी पाणी टेंभू योजनेतून उचलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत नियोजन केले आहे. टेंभू योजनेचा देशातच नव्हे, तर देशाबाहेरही दुष्काळग्रस्तांची योजना असा लौकीक आहे. गेल्या वर्षभरात योजनेची बहुतांशी कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे पाणी आता पुढे सरकू लागले आहे. याचा फायदा घेऊन तालुक्यातील सर्व तलाव टेंभूच्या पाण्याने ३० ते ३५ टक्के भरून घेऊ, असे सांगत टेंभूची उर्वरित कामे २०१७ पर्यंत नक्की पूर्ण होतील, असा आशावाद खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांनी पैसे भरूनही टेंभूचे पाणी देत नाही. पाण्याचे राजकारण करून शेतकऱ्यांचे हाल केले जात आहेत, असा आरोप महिपतराव पवार यांनी केला.