शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या काळजात भाजपची ‘कट्यार’

By admin | Updated: November 30, 2015 01:13 IST

सावळजमध्ये सरपंच, उपसरपंच निवड : ‘आबांं’च्या होम पीचवर ‘काकां’ची खेळी

दत्ता पाटील -- तासगाव माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यभर ख्याती असणाऱ्या सावळज (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सरपंच आणि उपसरपंचाची वर्णी लागली. सरपंच निवडीच्या निमित्ताने भाजपची सरपंच निवडीची कट्यार राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांच्या काळजात घुसल्याचे चित्र आहे, तर राष्ट्रवादीच्या दुहीचा नेमका फायदा घेत आबांच्या होम पीचवर भाजपचे खासदार संजयकाकांनी केलेली खेळी तूर्तास तरी भाजपच्या पथ्यावर पडली. एकेकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा वाहिलेल्या आर. आर. पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात सावळजमधून झाली. आबांनी पहिल्यांदा सावळज जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून राजकारणाचा पाया घातला. सावळजसह गटातील गावांनीही आबांना उच्चांकी मताधिक्यासह नेहमीच सोबत केली. सावळजच्या ग्रामपंचायत निवडणुका आबा गटाच्या बाजूने एकतर्फी झाल्या. निवडणुका झाल्याच, तर त्या आबा गटांतर्गतच दोन गटात व्हायच्या. इथे विरोधकांचे अस्तित्व नगण्य होते. मात्र काही वर्षांत अग्रणीतून फारसे पाणी वाहिले नसले तरी, राजकीय प्रवाह मात्र अनेक वळणे घेऊन गेला. त्यामुळे यावेळी झालेल्या निवडणुकांत भाजपने राष्ट्रवादीच्या एका गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवत दुसऱ्या गटावर निशाणा साधला. मात्र खासदार संजयकाकांना सावळजचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करायचा होता. त्यामुळे भापजच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय कट्यार चालवले. आता राष्ट्रवादीचे कारभारी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. खासदार पडद्यामागून पडद्यावरसावळजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भाजप आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने आणि वसंत सावंत यांच्या गटाने पॅनेल उभे केले होते. या पॅनेलच्या प्रचार पत्रकावर आर. आर. आबांसह माजी आ. दिनकरआबा पाटील यांचे छायाचित्र होते. मात्र खासदारांचे समर्थक पॅनेलमध्ये असून देखील त्यांचे छायाचित्र वगळण्यात आले होते. खा. संजयकाकांनी पडद्याआड केलेली पहिली खेळी यशस्वी ठरली. दुसऱ्या खेळीत राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनाच धक्का देत, दहा सदस्यांची मोट बांधून भाजपचा सरपंच करण्याची किमया त्यांनी साधली.राष्ट्रवादीने हक्क सोडला तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीतील नेत्यांत दावेदारी सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावळजमध्ये राष्ट्रवादीच्या एका गटासह भाजपने पॅनेल लावल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचा दावा केला होता. मात्र सरपंच निवडीत राष्ट्रवादीला डावलल्यामुळे नेत्यांनीही या गावावर असणाऱ्या वर्चस्वाचा हक्क सोडला.