शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नागठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत

By admin | Updated: October 19, 2015 23:49 IST

काँग्रेस-भाजपचा सामना : राष्ट्रवादीची फरफट

महेंद्र किणीकर- वाळवा पलूस तालुक्यातील नागठाणे ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी ७९ अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. निवडणूक दुरंगी होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निवडणुकीपूर्वी कॉँग्रेसमध्ये आल्याने, सध्या येथे कॉँग्रेसची १५-० अशी एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी एकत्रीत कॉँग्रेसशी लढत असल्याने पक्षीय पातळीवर नवी समीकरणे समोर येत आहेत.कॉँग्रेसने या निवडणुकीतही पुन्हा तसेच यश संपादन करण्याच्या चंग बांधला आहे, तर भाजप-राष्ट्रवादीने नागठाणे ग्रामपंचायतीमधील सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षातील तीन ते पाच कोटी रुपयांची केलेली विकासकामे, यांच्या बळावरच कॉँग्रेस जनतेपुढे जात आहे. कॉँग्रेसचे पतंगराव कदम विरुद्ध संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख अशाच तोफा धडाडणार आहेत. त्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकविताना अरुण लाड यांची फरफट होणार आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यामुळेच सवतासुभा न घेता भाजपसमवेत गेले आहेत. दि. २१ रोजी अंतिम चित्र समोर येणार आहे. भाजपचा ‘प्लॅन बी’माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचा ‘भाजप’ प्रवेश न रुचल्याने अनेकजण कॉँग्रेसवासी झाले. ही पोकळी भरून काढताना भाजपने प्लॅन-बी तयार केला असून खा. संजय पाटील यांच्या निधीतून काही विकासकामे सुरू केली. गावातील अंतर्गत रस्ते, गटारी, पाणंद रस्ते, बालगंधर्व स्मारक आणि बंद पडलेला पुरस्कार या प्रश्नांना हात घातला आहे.