शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीच्या धडकेत मायलेकी ठार

By admin | Updated: May 14, 2016 23:49 IST

तांदुळवाडीतील दुर्घटना : मॉर्निंग वॉक करताना अज्ञात वाहनाने उडविले

कुरळप : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे पहाटे फिरावयास गेलेल्या पुतळाबाई अमृत पाटील (वय ७०) व त्यांची मुलगी प्रभावती मधुकर पवार (४५, दोघीही रा. तांदुळवाडी) या मायलेकी अज्ञात मोटारीच्या धडकेत जागीच ठार झाल्या. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर गुरव पुलानजीक घडली. रेठरेहरणाक्ष सासर असलेल्या प्रभावती पवार पतीच्या निधनानंतर गेल्या बारा वर्षांपासून तांदुळवाडी येथे माहेरी राहत होत्या. आई पुतळाबाई व त्या दररोज पहाटे राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यावर फिरायला जात होत्या. शनिवारी पहाटे त्या नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडल्या. गुरव पुलाजवळ महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून कऱ्हाडकडे जाणाऱ्या अज्ञात मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन दोघीही रस्त्यावर पडल्या. डोक्यास वर्मी मार लागल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. मायलेकींच्या मृत्यूमुळे तांदुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुतळाबाई यांना चार मुली व दोन मुले असा परिवार आहे, तर प्रभावती यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. अपघाताबाबत मोहन शंकर पाटील (४०, रा. तांदूळवाडी) यांनी कुरळप पोलिसांत वर्दी दिली असून सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी चव्हाण अधिक तपास करीत आहेत.