शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या प्रेमळ दातृत्वाला संगीतमयी सलाम

By admin | Updated: May 11, 2016 00:46 IST

सांगलीत कार्यक्रम : मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफल; कलाकारांच्या सादरीकरणास श्रोत्यांची दाद

सांगली : आईच्या प्रेमळ दातृत्वाला, तिच्या अनेक रूपांना, तिच्यातच सामावलेल्या विश्वाला सांगलीत रंगलेल्या संगीत मैफलीतून सलाम करण्यात आला. ‘लोकमत’ सखी मंच व श्रीवरि व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मातृदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, मालतीताई जोशी यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन व धन्वंतरी पूजनाने करण्यात आले. ‘विठुमाऊली तू माऊली जगाची’ या सुंदर गीताने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर ‘लिंबलोण उतरू कशी’, ‘प्रेमस्वरुप आई’, ‘ए आई मला पावसात जाऊ दे’, ‘ माता न तू वैरिणी’, ‘यशोमती मैया से’, ‘दाटून कंठ येतो’, ‘ने मजसी ने’, ‘माऊली माऊली’, ‘खुशियों का दिन आया है’, ‘या चिमण्यांनो’, अशी एकापेक्षा एक अवीट व सुरेख गाणी सादर करण्यात आली. अभिषेक काळे, यशश्री जोशी, श्रद्धा जोशी, आस्था ओगले, श्रीनिवास हसबनीस या कलाकारांनी ही सुंदर गाणी सादर केली. दीपक पाटणकर यांच्या निवेदनानेही मैफलीला साज चढविला. सिंथेसायझरसाथ अविनाश इनामदार, हार्मोनिअमसाथ केदार सांभारे, तबलासाथ विवेक पोतदार, तालवाद्यावर किरण ठाणेदार, बासरीसाथ रसूल मुलाणी व ढोलकसाथ अजय भोगले यांनी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी हसबनीस, उपाध्यक्षा प्रियांका कुलकर्णी, खजिनदार अरुण नेने, वामन कुलकर्णी, निर्मला नेने, सोनाली कुलकर्णी, गोवर्धनराजे हसबनीस यांनी संयोजन केले. सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्यातून सखी मंच सदस्यांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. (प्रतिनिधी)‘लोकमत’ सखी मंच व श्रीवरि व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘आई... एक प्रेमळ दातृत्व’ हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, तसेच दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती संतोष पाटील, आर. जे. कुलकर्णी, मालतीताई जोशी आदी उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रामध्ये कलाकारांनी सुंदर गीते सादर करून मैफल रंगविली.