शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होतोय आठवड्याला एक खून

By admin | Updated: November 11, 2014 23:20 IST

प्रमाण वाढले : दोन महिन्यात दहा घटना; सांगली, मिरजेत पाच गुन्ह्यांची नोंद

सचिन लाड - सांगली -जिल्ह्यात गेल्या सव्वादोन महिन्यात एकापाठोपाठ एक दहा खून झाले आहेत. आठवड्याला एक खून, असे प्रमाण आकडेवारीवरून दिसून येत आहे. या कालावधित सांगली, मिरजेतच पाच खून झाले आहेत. खुनाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असले तरी, सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहेत. या दहा खुनातून १५ नवीन गुन्हेगार रेकॉर्डवर आले आहेत.अनैतिक संबंध, कौटुंबिक वाद, आर्थिक वाद, पूर्ववैमनस्य, दारूची नशा ही खुनामागची कारणे आहेत. महिन्यापूर्वी सांगलीत रात्रीत दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या. दोन्ही खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले. यातील एका खुनाचा २४ तासांत छडा लागला; मात्र शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. सांगली रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेला आठवड्याचा कालावधी पूर्ण झाला नाही, तोपर्यंत विजयनगरमध्ये आकाश गस्ते या तरुणाचा गळा चिरून खून केल्याचे उघडकीस आले. गेल्या आठवड्यात अंकलखोप (ता. पलूस) येथे दारूच्या नशेत एकाने पत्नी व मुलांचा खून केला. तत्पूर्वी वाळवा तालुक्यातील बोरगाव आणि कासेगाव येथील दोन महिलांचा अनैतिक संबंधातून खून झाला. जत तालुक्यातील एका शिक्षकाचा थरारक पाठलाग करून भरदिवसा खून केला. भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून मिरजेत तरुणाचा खून झाला. खुनाच्या सातत्याने घटना घडत असल्या तरी, त्याचा छडा लावून संशयितांना अटक केली जात आहे. दहा खुनाच्या गुन्ह्यांतून १५ नवीन गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. हे सर्वजण सध्या कारागृहात आहेत. चौघांचा संशयास्पद मृत्यू खुनी हल्ल्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. याशिवाय घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सुभाष झांबरे खून-खटल्यातील साक्षीदार, बनाळीतील (ता. जत) विवाहिता, राजेवाडीतील (ता. आटपाडी) शेतमजूर या तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. तपासातून त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उघडले नाही. महिन्यापूर्वी सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावर अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही.