शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

महापालिका सभा गोंधळात गुंडाळली

By admin | Updated: December 20, 2015 00:34 IST

महापौरांचा निषेध : प्रतिसभेचा विरोधकांचा प्रयत्न

सांगली : शासनाच्या १३ व्या आणि १४ व्या वित्त आयोगातील कामांचा विषय विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर झालेल्या प्रचंड गोंधळात महापौर विवेक कांबळे यांनी विषयपत्र न वाचताच मंजुरीची घोषणा करीत सभा गुंडाळली. यावर विरोधी सदस्यांनी महापौरांचा निषेध केला. सभागृहातच प्रतिसभा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला. महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच गोंधळाला सुरुवात झाली. कलम ४४ नुसार सदस्यांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे सुरू होण्यापूर्वीच वित्त आयोगाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, धनपाल खोत यांनी गत सभेत १३ व्या व १४ व्या वित्त आयोगाबाबत महापौरांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. वित्त आयोगातील निधी वाटपावर डिसेंबरच्या सभेत चर्चा करण्याचे आश्वासन देऊनही महापौर त्यावर चर्चा का करीत नाहीत, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यांना साथ देण्यासाठी सत्ताधारी गटातील माजी स्थायी समिती सभापती संजय मेंढेही उभे राहिले. त्यांनीही महापौरांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. वित्त आयोगाच्या निधी नियोजनाचा विषय चर्चेला घेण्याची जोरदार मागणी या सदस्यांनी केली. विरोधक आक्रमक होत असल्याचे दिसल्यानंतर महापौर विवेक कांबळे यांनी हा विषय सभेत चर्चेला येण्याचे कोणतेही कारण नाही. आजच्या सभेत तो चर्चेला घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर गोंधळातच विषयपत्र वाचण्याची सूचना त्यांनी दिली. तरीही गोंधळ कमी होत नसल्याचे दिसल्याने महापौरांनी विषयपत्रावरील सर्व विषय, कलम १ (ज) अंतर्गत तसेच आयत्यावेळचे सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर मेंढे वगळता सत्ताधारी सर्व सदस्य सभागृह सोडून निघून गेले. आक्रमक झालेल्या विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी महापौरांच्या धिक्काराच्या घोषणा सभागृहात दिल्या. एकत्र झालेल्या सदस्यांनी प्रतिसभा घेण्याचे ठरविले. सदस्य संख्येची गणना केल्यानंतर ३२ सदस्य सभागृहात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी धनपाल खोत यांना पीठासनावर बसण्याची विनंती केली. खोत यांनी नकार दिल्यानंतर प्रतिसभा घेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. (प्रतिनिधी) पत्रिका न वाचता या विषयांना मंजुरी ड्रेनेजच्या ठेकेदाराला काम करण्यासाठी मान्यता मिरजेतील इंदिरा घरकुल योजनेत मृत झोपडपट्टीधारकांच्या वारसांना लाभ मिळणार घनकचऱ्याच्या प्रकल्पासाठी सात सदस्यीय समिती नियुक्त ड्रेनेजच्या कर्मचाऱ्यांसाठी वेळेचा, सेवेचा आकृतिबंध मंजूर भटक्या जनावरांवर उपचार व श्वान दत्तक योजनेसाठी नियुक्त संस्थेला पाच वर्षे मुदतवाढ