शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जत पालिकेचा कारभार पंचायतीसारखा

By admin | Updated: June 17, 2016 23:32 IST

नागरिकांचा अपेक्षाभंग : अपुरे-अप्रशिक्षित कर्मचारी; शहरातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित

जयवंत आदाटे-- जत --नगरपालिकेची स्थापना होऊन ८ जून २०१६ रोजी चार वर्षे पूर्ण झाली. परंतु येथे अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग कार्यरत असल्यामुळे नगरपालिका असूनही कारभार ग्रामपंचायतीसारखा सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मटण मार्केट, भाजी मार्केट आदी महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधक विकास कामाला राजकीय द्वेषातून विरोध क रत आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामांना खीळ बसत आहे.जत नगरपालिकेक डे सध्या एकूण ४४ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. शासनाकडे आणखी २६ कर्मचाऱ्यांची नव्याने मागणी करण्यात आली आहे. राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या १०१ नगरपालिकांत दोन हजार ७७८ कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामध्ये जत पालिकेचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात नव्याने कर्मचारी भरती होणे अपेक्षित आहे.नगरपालिकेसाठी सुसज्ज इमारत नाही. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या एका छोट्या इमारतीत सध्या कारभार कसा तरी सुरू आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. नगरपालिकेत अपुरी जागा असल्यामुळे विषय समिती सभापती, शाखा अभियंता, विरोधी गटनेते, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा अथवा कक्ष नाही. दोन मोठ्या आरसीसी खोल्यांच्या इमारतीमधून पालिकेचा कारभार केला जात आहे. दैनंदिन कामासाठी नागरिक पालिके त आले, तर त्याना ताटकळत दाटीवाटीने उभे राहून आपले काम करुन घ्यावे लागते आहे. या इमारतीत एकच शौचालय, तेही अरुंद जागेत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी व महिलांसाठी येथे स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जत नगरपालिकेतच स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेत पूर्णवेळ कायम स्वरुपात शाखा अभियंता नाहीत. हंगामी शाखा अभियंता आहेत. त्यांच्याकडून जत शहराच्या विकासात भर घालणारे काम झालेले नाही. गंधर्व ओढापात्राचे सुशोभिकरण करताना त्यांनी मनमानी केली आहे. त्यामुळे नगरसेवक त्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. मुख्याधिकारी म्हणून पंडित पाटील काम पाहत आहेत. त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे एक-दोन दिवस नगरपालिकेत व इतर दिवस ते जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत आहेत. त्याचा विपरित परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.अग्निशामक दल येथे मंजूर झाले आहे. परंतु त्याची पूर्णता अद्याप झालेली नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास विजापूर, तासगाव, सांगोला येथून अग्निशामक यंत्रणा मागवावी लागते. नगरपालिकेत सत्ताधारी कोण आहेत व विरोधक कोण आहेत, हेच समजून येत नाही. नगरसेवकांसमोर विकास कामांचे आव्हान आहे. येणाऱ्या काही दिवसात त्याची पूर्तता त्यांच्याकडून व्हावी, अशी जत शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. यामुळे शहराच्या विकासाल खीळ बसत असल्याने नागरिकांनी मग नगरपालिके ला सर्व कर तर का भरायचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.भम्रनिरास : शहराचा कायापालट नाहीचजत पालिकेची स्थापना ८ जून २०१२ रोजी झाली. पाच प्रभाग असून नगरसेवकांची संख्या सोळा आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर जत शहराचा कायापालट होईल, संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाईल, अशी आशा नागरिकांना होती. परंतु अपुरा व अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्यामुळे ही आशा फोल ठरली आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असल्याचे नागरिकांची भावना आहे.