शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शाॅकने महापालिका कर्मचाऱ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

सांगली : महापालिकेच्या १ कोटी २९ लाख रुपयांच्या वीजबिल घोटाळ्याचा शाॅक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसला आहे. आता त्यांच्या पगारातून ...

सांगली : महापालिकेच्या १ कोटी २९ लाख रुपयांच्या वीजबिल घोटाळ्याचा शाॅक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसला आहे. आता त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. पण केवळ कामातील हलगर्जीपणाची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागत आहे. दुसरीकडे महावितरण कंपनीमधील अनागोंदी कारभाराबद्दल मात्र कोणीच अवाक्षरही काढत नसल्याबद्दल नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. या घोटाळ्यात नेमकी चूक कोणाची, हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे.

महापालिकेच्या एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२० या दीड वर्षातील वीजबिलात एक कोटी २९ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. त्यामुळे महापालिकेच्या विद्युत, लेखा व लेखापरीक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. आता आयुक्त नितीन कापडणीस यांनी १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही रक्कम पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले. वास्तविक महावितरण कंपनीच्या कारभाराचा फटका महापालिकेला बसला होता. तरीही त्याची जबाबदारी मात्र पालिका कर्मचाऱ्यावर निश्चित करण्यात आली. पोलिसांत तक्रार झाल्यानंतर महावितरण कंपनीचा कर्मचारी, संबंधित वीज भरणा केंद्र व पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह इतरांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटकही झाली. यात आतापर्यंत तरी कुठेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश उघड झालेला नाही. तरीही वरिष्ठांकडून इतकी मोठी शिक्षा कशासाठी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. महावितरणच्या करंटने महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोर का झटका लागला आहे.

चौकट

१२३ बिलांत घोळ

महापालिकेचे ४५० हून अधिक वीज मीटर आहेत. त्यापोटी दरमहा महावितरणकडून बिले येत असतात. दीड वर्षाच्या काळात १२३ वीज बिलांत घोळ झाल्याचे महावितरणकडूनच स्पष्ट करण्यात आले आहे. या बिलापोटीची रक्कम इतर ग्राहकांच्या नावावर जमा करण्यात आल्याचे महावितरणने कबूल केल्याचा दावा पालिकेचे अधिकारी करत आहेत.

चौकट

वाढीव व थकीत बिलांचा समावेश

महावितरणकडून दरमहा जी बिले महापालिकेला प्राप्त झाली, त्यात काही बिलांत गत महिन्याची थकबाकी दिसत होती. तर काही बिले वाढीव आकार लावून आली होती. पण ही सारी बिले पालिकेने भरलेली होती. वास्तविक वाढीव आकार का लावण्यात आला, थकबाकी का दिसत आहे, याची तपासणी करण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांची होती. तेथेच हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते.

चौकट

महावितरणवर संशयाची सुई

महापालिकेकडून वीजबिलापोटी महावितरणच्या नावे धनादेश व ज्या मीटरचे बिलचे आहे, त्याची यादी दिली जात होती. धनादेशातील काही रक्कम महापालिकेच्या बिलापोटी तर काही रक्कम खासगी ग्राहकांच्या नावावर जमा होत होती. महापालिका अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्का असलेला धनादेश दिला जात होता. महावितरणमध्ये संगणकावर रिसीट तयार करताना हा धनादेश महापालिकेचा आहे, त्यात खासगी ग्राहकांची बिले कशी आली, अशी शंका महावितरणच्या कर्मचाऱ्यांना का आली नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

चौकट

दोन हजारांपासून अडीच लाखांपर्यंतची बिले भरली

महापालिकेच्या धनादेशावर दोन हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंतची खासगी ग्राहकांची बिले भरली गेली आहेत. घरगुती ग्राहकांपासून ते अनेक बड्या व्यापाऱ्यांपर्यंतची बिले अदा करण्यात आली. इतकेच नव्हे तर शासकीय यंत्रणेतील कार्यालयाची बिले भरली गेली असल्याचे दिसून येत आहे.