शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खासदार-सरकार संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: June 15, 2015 00:18 IST

बाजार समिती निवडणूक : अजितराव घोरपडेंचे तासगाव बाजार समितीत पॅनेल?

दत्ता पाटील, तासगाव :सहकारी संस्थांच्या हितासाठी बिनविरोधचा ढोल वाजविला जात असला तरी, छुप्या संघर्षाचे रागही यानिमित्ताने आळविले जात आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकीकडे भाजप व राष्ट्रवादीची खलबते सुरू असतानाच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक असणारे अ‍ॅड. स्वप्नील पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे खासदार-सरकार यांच्यातील छुपा संघर्ष ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संस्थेच्या हितासाठी बिनविरोधसाठी तयारी असल्याचे मत खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केले होते. राष्ट्रवादीतीलही एक गट बिनविरोधसाठी अनुकूल आहे. दोन्ही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीच्या बाबतीत भाजप आणि राष्ट्रवादीत खलबते सुरु असतानाच, भाजपमधील खासदार संजय पाटील आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यातील छुपा संघर्ष ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यात विधानसभा निवडणुकीचा सामना रंगला होता. या निवडणुकीत घोरपडे पराभूत झाले. तेव्हापासून घोरपडे आणि खासदार संजय पाटील यांच्यात अंतर पडण्यास सुरुवात झाली. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अ‍ॅड. स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढवली. त्यावेळी खासदार पाटील यांनी अ‍ॅड. पाटील यांच्या उमदेवारीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु अजितराव घोरपडे गटाने स्वप्नील पाटील यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. घोरपडेंचे प्राबल्य असणाऱ्या काही गावात मताधिक्यही मिळाले होते. तेव्हापासून अ‍ॅड. पाटील आणि घोरपडेंची जवळीकता निर्माण झाली. मात्र घोरपडे आणि खासदार यांच्यातील अंतर वाढले. काही दिवसांपूर्वीच घोरपडे समर्थक बाजार समितीचे माजी उपसभापती रमेश साबळे यांनी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. मुळात घोरपडे समर्थक असताना साबळे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्यामुळे सरकार आणि खासदार यांच्यातील रुंदावलेली राजकीय दरी उघड झाली आहे. खासदारांनी कवठेमहांकाळमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शह दिल्यानंतर, आता अजितराव घोरपडेंनीही तासगावमध्ये काटशह देण्यासाठी हालचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची तडजोड झाल्यास स्वतंत्र पॅनेल लावणार असल्याची भूमिका स्वप्नील पाटील यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्या पॅनेलला घोरपडेंचे पाठबळ असून, खासदार पाटील यांच्याविरोधात बाजार समिती निवडणुकीच्यानिमित्ताने अजितराव घोरपडे आक्रमक होणार असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. घोरपडे समर्थकांची गैरहजेरी बाजार समिती निवडणुकीच्यानिमित्ताने खासदार पाटील यांच्या चिंंचणी येथील बंगल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीला स्वप्नील पाटील यांच्यासह घोरपडे समर्थकांची गैरहजेरी होती. त्यामुळे खासदार-सरकार गट बाजार समितीच्या निमित्ताने एकत्रित राहणार की विरोधात, याबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत घोरपडे आमच्यासोबत असतील, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तासगावातही काँग्रेस आणि सरकार गट एकत्रित येतील काय? याकडे लक्ष लागून राहिले आहे. अशी रुंदावली दरी ४विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर घोरपडे-खासदार यांच्यातील संपर्क थांबला ४विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे बंडखोर स्वप्नील पाटील यांना घोरपडे समर्थकांचे पाठबळ ४जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये खासदार संजय पाटील यांचा समावेश, अजितराव घोरपडे तटस्थ ४राष्ट्रवादीतून घोरपडेंच्या गटात आलेल्या रमेश साबळे यांचा खासदारांच्या गटात प्रवेश ४आता घोरपडेंच्या नेतृत्वाखाली अ‍ॅड. स्वप्नील पाटील यांची बाजार समितीसाठी मोर्चेबांधणी