शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दरासाठी साखरसम्राटांनीच आंदोलन करावे : सदाभाऊ खोत

By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST

पाटील हे साखरसम्राटांचे नेते असल्याचे मानतात. त्यांनी स्वत:च्या कारखान्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करुन स्वत:चे नाव गिनीज बुकात नोंदवावे,

अशोक पाटील - इस्लामपूर --गेली १५ वर्षे आमचे नेते राजू शेट्टी आणि मी ऊस दरासाठी आंदोलन करत आहे. गत आंदोलन जयंत पाटील यांनी चिघळविण्याचा प्रयत्न केला. याचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडी काँग्रेसला बसला आहे. शाहू कारखान्याने २५३0 रुपये दर जाहीर केला आहे. जयंत पाटील हे साखरसम्राटांचे नेते असल्याचे मानतात. त्यांनी स्वत:च्या कारखान्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करुन स्वत:चे नाव गिनीज बुकात नोंदवावे, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. याचवेळी त्यांनी, साखरसम्राटांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्यास ते जगातील आश्चर्य ठरेल, असा टोलाही ‘लोकमत’शी बोलताना मारला.खोत म्हणाले की, खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस, कांदा, हळद अशा नगदी पिकांना दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलने केली. यामुळेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला केंद्रात व राज्यात चांगले दिवस आले आहेत. यामुळेच संघटनेतील काही मतलबी नेते संघटना फुटणार, अशी हवा उठवत आहेत. ज्यावेळी राजू शेट्टींपासून सदाभाऊ खोत दुरावतील, तेव्हाच संघटना फुटेल हे त्यांनी लक्षात ठेवावे.साखरसम्राटांनी आमचा आदर्श घेतला आहे. त्यांना आता लक्षात आले आहे की, ऊस उत्पादकाला दर मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच जयंत पाटील गत आंदोलनापासून उसाला ३ हजार रुपये दर देण्याची भाषा करीत आहेत. जयंत पाटील यांनी परवाच बहे येथे झालेल्या एका कार्यक्रमात, आंदोलन हे कोणाच्या विरोधी नसते. उसाला दर मिळायलाच हवा. ही लोकभावना आहे. त्याचा आदर करा, असे वक्तव्य केले होते. हे आम्ही केलेल्या आंदोलनाचे फलितच म्हणावे लागेल.उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावे लागत होते. आता साखरसम्राटांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्यास कोणाचेही नुकसान होणार नाही. ऊस कामगार व यंत्रणा साखरसम्राटांच्या अधिपत्याखाली असल्याने, हे आंदोलन यशस्वी होऊन उसाला ३ हजार रुपये दर मिळेल. हेच आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यश मानतो, असेही खोत यांनी यावेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)आक्रमक आंदोलन हवे सदाभाऊ खोत म्हणाले की, रघुनाथ पाटील लोकसभा निवडणुकीपासून कोठे होते कोणालाच माहिती नव्हते. आम आदमी पक्षाचा नाद सोडून गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा उगवले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस दरप्रश्नी त्यांची कोल्हेकुई सुरु झाली असून त्यांनी गर्दी गोळा करण्यासाठी राज ठाकरेंचा आसरा घेतला आहे. फक्त गर्दी खेचून ऊस दर मिळत नाही, त्यासाठी रस्त्यावर येऊन आक्रमक आंदोलन करून रक्त सांडावे लागते, हे दादांनी लक्षात घेण्याची गरज आहे.