शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धनगर समाजाच्यावतीने आंदोलन

By admin | Updated: July 28, 2014 23:25 IST

आरक्षणाची मागणी : पद्माकर वळवी आणि मधुकरराव पिचड यांच्या भूमिकेचा निषेध, बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन

सांगली : धनगर समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आज (सोमवार) ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे आरक्षणास विरोध केल्याबद्दल मंत्री पद्माकर वळवी व मधुकरराव पिचड यांचा समाजातर्फे निषेध करण्यात आला. आष्टा, कासेगाव येथे उद्या (बुधवारी) बंदचे आवाहन करण्यात आले आहे.आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील धनगर समाजाच्यावतीने सोमवारी बसस्थानकासमोरील संभाजी चौकात भरपावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आरक्षणास विरोध करणाऱ्या मंत्री पद्माकर वळवी व मधुकर पिचड यांचा निषेध करण्यात आला. प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. बुधवार, दि. ३0 रोजी बंदची हाक देण्यात आली आहे.येथील धनगर गल्लीतील अहिल्या चौकात सकाळी सर्व युवक कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढली. एस.टी. स्टॅण्डसमोरील संभाजी चौकात भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष बाबा सिध्द, सत्तू ढोले म्हणाले, प्रा. के. ए. माने, रामचंद्र सिध्द, बिरू बोते, वीर कुदळे, रघुनाथ बोते, कपिल बोते, पोपट भानुसे, विजय माने, गोविंद ढोले, पोपट शेळके, विजय भानुसे, कृष्णा गावडे, अण्णा फुलारे, बाबासाहेब ढोले, दीपक ढोले, सागर सिध्द, पांडुरंग ढोले, बाळासाहेब शेळके, बंडा टकले, गजानन शेळके उपस्थित होते. कडेगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यास विरोध केल्याबद्दल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके यांचा निषेध केला. तसेच राज्य शासनाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही, तर बुधवार, दि. ३० रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. आरक्षण देण्यास आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके यांनी विरोध केला आहे. या सर्वांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. तसेच शासनाने दोन दिवसांत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही, तर बुधवार, दि. ३० रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.निवासी नायब तहसीलदार पी. एल. माने यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. वांगीचे उपसरपंच राहुल होनमाने, विकास एडके, सचिन दार्इंगडे, आप्पा एडके, मंगेश वाघमोडे, पवन जानकर, उल्हास शिंदे, सुदाम होनमाने, भरत होनमाने, अभिजित कोळेकर उपस्थित होते. इस्लामपूर : येथील जयमहाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करू नयेत, असे सांगणाऱ्या मंत्र्यांच्या जाहीर निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार अरुण निकम यांना विद्यार्थी सेनेचे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी दिले.यावेळी सुरेश ताटे, राहुल जगताप, विकास वाघमोडे, दिनकर कोळेकर, सागर बंडगर, राहुल मगदूम, धीरज हुबाले, सचिन बंडगर, शिवाजी कोळेकर, उपस्थित होते. (प्रतिनिधी)