शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा मूड यंदा गॅप घेण्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

सांगली : गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. या स्थितीत सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी-बारावीच्या ...

सांगली : गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. या स्थितीत सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेकडे लिटमस टेस्ट म्हणूनच पाहायचे ठरवल्याचे दिसत आहे. पुरेसा अभ्यास झालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत ड्रॉप घेतला आहे.

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही पूर्णत: संपलेला नाही. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन याची निश्चिती झालेली नाही. परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर होणार की मर्यादित अध्यापनावर याचीही स्पष्टता नाही. संपूर्ण वर्ष ऑनलाइन अभ्यास करावा लागला, त्याचा परिणाम गुणवत्तेवरही झाला. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांनी यंदाची परीक्षा नाममात्रच द्यायची ठरवली आहे. श्रेणी सुधारचा पर्याय राखून ठेवला आहे. येत्या एप्रिलमध्ये परीक्षा द्यायची; पण पुढे ऑक्टोबर आणि त्यानंतरचा मार्च-एप्रिलला पुन्हा परीक्षेला बसायचे. जास्त गुण मिळवायचे, जुने गुणपत्रक बोर्डाकडे जमा करून वाढीव गुणवत्तेच्या गुणपत्रकाच्या आधारे पुढील शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा, असे या विद्यार्थ्यांचे नियोजन आहे.

विशेषत: जेईई, नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल गॅप घेण्याकडे आहे. बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल शाखेकडे जाणाऱ्यांना जास्त गुण खुणावताहेत. त्यामुळे यंदाची परीक्षा त्यांच्या दृष्टीने एक प्रकारे चाचणीच आहे. मेरिट मिळाले तर ठीक, अन्यथा हिवाळी किंवा पुढील उन्हाळ्यातील परीक्षेत स्कोअर करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

चौकट

हिवाळी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी वाढणार

१. यंदा दहावीसाठी सुमारे दोन हजार, तर बारावीसाठी दीड हजार विद्यार्थी पुनर्परीक्षा देत आहेत. अभ्यासक्रम शंभर टक्के न झाल्याने मर्यादित अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा होण्याचे संकेत परीक्षा मंडळाने दिले आहेत. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न पुनर्परीक्षार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांना कोरोना एक प्रकारे लाभदायीच ठरला आहे. पुरेसा अभ्यास झालेला नसतानाही दहावी-बारावीत उत्तीर्ण होण्याची त्यांना संधी मिळाली आहे.

२. दहावीनंतर कला, वाणिज्य शाखेत ११ वी करणारे तसेच बारावीनंतर पदवी घेणारे मात्र गॅप घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांच्या दृष्टीने ही कोरोनाची लॉटरीच आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना मेरिटची प्रचंड स्पर्धा असल्याने त्याचे विद्यार्थी मात्र गॅप घेत आहेत. ते परीक्षेला बसतील. मात्र, यंदाची गुणपत्रिका पुढील प्रवेशासाठी वापरणार नाहीत. परीक्षा मंडळाकडे जमा करून पुढील परीक्षेद्वारे जास्त गुण‌वत्तेची गुणपत्रिका मिळवतील. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी परीक्षेला तसेच पुढील उन्हाळी परीक्षेला पुनर्परीक्षार्थींची संख्या खूपच असणार, हे स्पष्ट आहे.

दहावीचे परीक्षार्थी

२०२० - ३८४७३

२०२१ - ४०८४४

बारावीचे परीक्षार्थी

२०२० - ३४२६८

२०२१ - ३३०९०