शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कापूसखेड येथे विजेच्या धक्क्याने माकड जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST

कापूसखेड येथे विजेचा धक्का लागून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेले माकड. दुसऱ्या छायाचित्रात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. लोकमत न्यूज ...

कापूसखेड येथे विजेचा धक्का लागून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेले माकड. दुसऱ्या छायाचित्रात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथे झाडांवर खेळणाऱ्या माकडांच्या कळपातील तीन माकडांना विजेच्या तारेचा धक्का बसला. यातील दोन माकडांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी धूम ठोकली, तर एका माकडाचा हात भाजून ते खाली पडल्याने त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली. त्यातून त्याची आतडी बाहेर आली होती. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारात घडली. त्याचवेळी वन विभागाला ही माहिती देण्यात आली. मात्र घटनास्थळी तब्बल पाच तास उशिरा येऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मर्कटलीला केल्या.

माजी सरपंच प्रदीप पाटील यांच्या घराजवळ ही घटना घडली. त्यांनी तात्काळ इस्लामपूरच्या शासकीय पशुसंवर्धन रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉ. प्रकाश कोळी १० ते १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. याचवेळी ही माहिती शिराळा येथील वन विभागाला देण्यात आली. तोपर्यंत झाडावर जखमी अवस्थेत असलेल्या माकडाला अविष्कार पाटील, अभिलाष पाटील, ऋषिकेश पाटील, ओंकार मरळे यांनी झाडावरून खाली घेतले. पोट फाटल्याने या जखमी माकडाची अवस्था गंभीर बनली होती. तशाही परिस्थितीत माकडाचा जीव वाचविण्यासाठी ही मुले धडपडत होती.

सायंकाळी साडेसात वाजता वन विभागाचे कर्मचारी आले. त्यांनी, परिसरातील कुत्री बांधून ठेवा, असे फर्मान सोडले. तसेच या माकडाला आम्ही हात लावणार नाही, अशी भूमिका घेत मर्कटलीला दाखविल्या. शेवटी या चौघा मुलांनीच या माकडाला घेऊन इस्लामपूरचे रुग्णालय गाठले. तेथे रात्री उशिरा डॉ. अंबादास माडकर आणि डॉ. प्रकाश कोळी यांनी माकडावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर या जखमी माकडाला वन्यजीवांच्या अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी त्याला घेऊन गेले.