शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

एक तपानंतर महापालिकेच्या पर्यावरण अहवालाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST

सांगली : गेल्या बारा वर्षांपासून पर्यावरण अहवालाबाबत महापालिका प्रशासनाने कधीच गांभीर्य दाखविले नाही; पण यंदा आयुक्त नितीन कापडणीस यांनी ...

सांगली : गेल्या बारा वर्षांपासून पर्यावरण अहवालाबाबत महापालिका प्रशासनाने कधीच गांभीर्य दाखविले नाही; पण यंदा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य विभागाला पर्यावरण अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. आता खासगी कंपनीकडून हा अहवाल तयार करण्याचे सुरू झाले असून, येत्या ६० दिवसांत हा अहवाल महापालिकेला सादर होणार आहे.

महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. महापालिकेच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी व ध्वनी प्रदूषण आदींचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हा एक उद्देश असतो. शिवाय शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा ऊहापोह झाल्यास प्रदूषण करणाऱ्या बाबींवर नियंत्रण आणता येते. पण या साऱ्या गोष्टींना महापालिकेने फाटा दिला होता.

महापालिकेच्या स्थापनेनंतर केवळ २००८-०९ मध्ये पर्यावरण अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानंतर आजअखेर त्याला मुहूर्त सापडला नव्हता. आयुक्त नितीन कापडणीस यांनी पर्यावरण अहवालाबाबत सजगता दाखविली. आता अहवाल तयार करण्यासाठी भिवंडी येथील स्कायलॅब ऍनाल्याटिकल लॅबाेरोटरी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचे चार प्रतिनिधींकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हा पर्यावरण अहवाल ६० दिवसांत तयार केला जाणार आहे. पर्यावरणात होणारे बदलांची माहिती होण्यासाठी एक यंत्र आरोग्य मुख्यालय येथे लावण्यात आले आहे. तब्बल एक तपानंतर महापालिकेला पर्यावरण अहवालासाठी मुहूर्त सापडला आहे.