शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

आज्या मेहरबान गॅँगला मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST

इस्लामपूूर : शहरातील वर्चस्ववादाच्या कारणातून जूनमध्ये एकाचा खून करणाऱ्या आज्या मेहरबान टोळीतील सात जणांवरील मोक्का कारवाईला राज्याचे अप्पर पोलीस ...

इस्लामपूूर : शहरातील वर्चस्ववादाच्या कारणातून जूनमध्ये एकाचा खून करणाऱ्या आज्या मेहरबान टोळीतील सात जणांवरील मोक्का कारवाईला राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. राजेंद्र सिंग यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. या टोळीविरुद्ध येथील मोक्का न्यायालयात २१०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या टोळीचा प्रमुख अजित हणमंत पाटील (वय २८, रा. पाटील भजनी मंडळाजवळ), सूरज ऊर्फ पांड्या अशोक जाधव (२६, रा. तानाजी चौक), प्रतीक ऊर्फ पिल्या सुरेश पाटील (१९, रा. तिरंगा चौक), कप्या ऊर्फ कपिल कृष्णा पवार (२६, तानाजी चौक), सचिन ऊर्फ रघू बाबूराव कोळेकर (३३, रा. निनाईनगर) आणि संतोष भीमराव कोळेकर (३२, रा. धनगर गल्ली) या गुंडांविरुद्ध पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. खून आणि मोक्का अशा दोन्ही कारवाईचा तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केला आहे. या कारवाईत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. जून महिन्यात आज्या पाटील गॅँगने संतोष रखमाजी कदम याचा चाकूने भोसकून खून केला होता. कदम आपल्या गॅँगसोबत काम करीत नाही, यावरून त्याची बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीतून मध्यरात्रीच्या साडेबाराच्य सुमारास संतोष कदम याच्या घरासमोर जाऊन वरील टोळक्याने त्याचा खून केला होता. या घटनेनंतर वरील सर्व संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

या टोळीने इस्लामपूर शहरासह इतर ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जमिनी-प्लॉट बळकाविणे व सावकारीसह अनेक गुन्हे करत दहशत माजविली होती. त्यांच्या या दहशतीला पायबंद घालण्यासाठी या टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा अवलंब केला. पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर पोलीसप्रमुख मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगळे यांनी तपास केला. पोलीस नाईक संदीप सावंत यांनी तपासात सहकार्य केले.

चौकट

सहा मोक्का... ३७ जण आत

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, इस्लामपूर उपविभागात आतापर्यंत सहा टोळ्यांना मोक्का कारवाईचा दणका दिला आहे. या सहा टोळ्यांतील ३७ गुंड गेल्या दीड-पावणे दोन वर्षापासून कारागृहात खितपत पडले आहेत. आतापर्यंत इस्लामपुरातील सोन्या शिंदे, अनमोल मदने, पारधी गॅँग, कप्या पवार, अज्या मेहरबान या टोळ्यांसह आष्ट्यातील उदय मोरे गॅँगवर कारवाई झाली आहे. शहरातील आणखी काही टोळ्या या कारवाईच्या रडारवर आहेत. या टोळ्यातील गुन्हेगारांनी एक चूक जरी केली तर त्यांच्यावर मोक्का कारवाई अटळ आहे.

फोटो -२५१२२०२०-आयएसएलएम-आज्या मेहरबान गॅँग (एका पट्टीत सहा सिंगल फोटो आहेत.)