शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील बंड्या कुटे गँगच्या तिघांना मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील सेन्टरिंग मजुराकडील दोन हजार रुपये लुबाडण्याच्या उद्देशाने त्याला जबरदस्तीने दुचाकीवर घेऊन कापूसखेड रस्त्यावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरातील सेन्टरिंग मजुराकडील दोन हजार रुपये लुबाडण्याच्या उद्देशाने त्याला जबरदस्तीने दुचाकीवर घेऊन कापूसखेड रस्त्यावरील निर्जन प्लॉटमध्ये डोक्यात लोखंडी गज मारून त्याचा खून करणाऱ्या बंड्या कुटे गँगमधील तिघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याखाली (मोक्का) कारवाई करण्यात आली. विभागातील ही आठवी कारवाई असून आतापर्यंत ४३ गुंड गजाआड झाले आहेत.

संदीप उर्फ बंड्या शिवाजी कुटे (२२, लोणार गल्ली, इस्लामपूर), ऋतिक दिनकर महापुरे (२१, खांबे मळा, इस्लामपूर) आणि अनिल गणेश राठोड (२६, लोणार गल्ली, इस्लामपूर, मूळ रा. ऐनापूर, जि. विजापूर) अशी तिघांची नावे आहेत. तिघांनी राजेश सुभाष काळे (३५, नेहरूनगर, इस्लामपूर) याचा खून केल्याचा ठपका आहे. इस्लामपूरसह आष्टा शहरातील गुंडांच्या आठ टोळ्या या मोक्का कारवाईत कारागृहात खितपत पडल्या आहेत. अजूनही काही गुंड या मोक्का कारवाईच्या रडारवर आहेत.

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले की, ८ मार्चच्या रात्री राजेश काळे दारू पिऊन चेतना देशी दारूच्या दुकानाजवळ पडला होता. यावेळी हे तिघे या दारू दुकानासमोरून जात होते. दुचाकीवरून उतरून एकाने काळेकडील पैसे काढून घेण्याच्या उद्देशाने त्याचे खिसे तपासले. मात्र, हा परिसर रहिवासी वस्तीत असल्याने दंगा होऊ नये म्हणून काळे याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कापूसखेड रस्त्यावरील निर्जनस्थळी घेऊन गेले. तेथे त्याच्या पँटच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेत असताना त्याने प्रतिकार केला. त्यावेळी बंड्या कुटे याने दुचाकीला लावलेला लोखंडी गज काढून त्याच्या कानाजवळ मारला. त्यातूनही सुटका करून घेण्यासाठी राजेश काळे याने पळ काढला. मात्र तिघांनी त्याला गाठून खाली पाडले आणि अनिल राठोड याने त्याच्या डोक्यात दगड घातला त्यात काळे जागीच ठार झाला होता.

तत्कालीन निरीक्षक नारायण देशमुख यांनी या टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवला होता. अप्पर पोलीस महासंचालक डॉ. राजेंद्र सिंग यांनी दोषरोपपत्र दाखल करण्यास अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर या टोळीविरुद्ध इस्लामपूरच्या मोक्का न्यायालयात ते दाखल करण्यात आले. हवालदार संदीप सावंत यांनी तपासकामी मदत केली.