शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे मोबाईल चोरट्यांचे सोयीचे ठरतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST

फोटो दुपटे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत शिथिलता देण्यात आल्यानंतर बाजारपेठेतील गर्दी वाढत ...

फोटो दुपटे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत शिथिलता देण्यात आल्यानंतर बाजारपेठेतील गर्दी वाढत आहे. या कालावधीत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असून, आकाराने मोठे असलेले मोबाईल हातात न घेता खिशात ठेवले जातात आणि चोरटे अलगदपणे हा मोबाईल लांबवत असल्याने आकाराने मोठे मोबाईल चोरट्यांचे लक्ष्य ठरत आहेत.

हातात मोबाईल धरता येत नसल्याने अनेकजण खिशात ठेवतात. मोबाईल आकाराने मोठा असल्याने खिशातही तो अर्धवटच बसतो. अशावेळी बाजारपेठेत, गर्दीच्या ठिकाणी पॅन्टच्या खिशात अथवा अगदी शर्टच्या खिशातूनही मोबाईल लंपास केले जात आहेत.

भाजीपाला खरेदीवेळी अनेकजण वाकून ती खरेदी करतात. यावेळी हीच संधी साधून चोरटे हळूवारपणे खिशात हात घालून मोबाईल काढतात. त्यातूनही व्यक्तीला चाहुल लागलीच तर उलट तेच चोरटे त्याला तुमचा मोबाईल पडत होता म्हणून दिशाभूलही करतात.

चौकट

पोलिसांकडे तक्रारी वाढल्या

* सांगलीत या पंधरवड्यात दिवसाला सरासरी एक ते दोन मोबाईल चाेरीच्या घटना घडल्या आहेत.

* शहरात घरात घुसून मोबाईल चोरीच्या प्रकारांत मात्र वाढ झाली आहे.

* गर्दीच्या ठिकाणी खिशातून अथवा पर्स, पिशवीमधून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत.

चौकट

या भागांमध्ये मोबाईल सांभाळा

* शहरातील विश्रामबाग आठवडा बाजार, संजयनगर, मंगळवार बाजार व शनिवार बाजारावेळी मोबाईल चोरीच्या घटना नेहमी वाढत असतात.

* सांगलीतील कापड पेठ, हरभट रोड, मारुती रोड, गणपती पेठ, विश्रामबाग याठिकाणी नागरिकांनी आपला मोबाईल सांभाळण्याची आवश्यकता आहे.