शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिसागर’च्या साहित्यातून मिरजेत कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

महापालिकेच्या सभेत काही नगरसेवकांनी आदिसागरमधील साहित्य गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आयुक्त कापडणीस यांनी पत्रकार बैठकीत ...

महापालिकेच्या सभेत काही नगरसेवकांनी आदिसागरमधील साहित्य गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आयुक्त कापडणीस यांनी पत्रकार बैठकीत खुलासा केला. ते म्हणाले की, गतवर्षी आदिसागर कोविड सेंटरसाठी खरेदी केलेले सर्व साहित्य सुरक्षित आहे. ३५ हायफ्लो नोझल ऑक्सिजन मशीन व पाच व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना भाड्याने दिले आहेत. त्याचे दररोजचे २० हजार भाडे महापालिकेला मिळत आहे. ऑक्सिजन टँक, बेड, एक्सरे मशीन, लॅबच्या साहित्यातून तंत्रनिकेतनमधील कोविड सेंटर सुरू करीत आहोत. यामुळे मिरजेच्या सेंटरवर एक रुपयाही नव्याने खर्च करण्याची गरज भासली नाही. केवळ ऑक्सिजन लाईन नव्याने टाकण्याची गरज होती. हा खर्चही सीएसआरमधून होणार आहे. हे कोविड सेंटर महालॅबशी जोडण्यात आले आहे.

महापालिकेने क्वारंटाईनपासून होम आयसोलेशनपर्यंतची व्यवस्था उभी केली आहे. १६ आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात होईल. त्यासाठी आणखी १४ केंद्रे वाढविली जाणार आहेत. प्रत्येक वाॅर्डात एक लसीकरण केंद्र उभारण्यात येईल. सध्या लसीकरण व कोरोना चाचणी एकाच ठिकाणी सुरू असून, चाचणी स्वतंत्र इमारतीत सुरू केली जाणार आहे. महापालिकेने १३ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. पाच शववाहिकाही आहेत. महापालिका क्षेत्रात २५ कोविड सेंटर सुरू आहेत. त्यात १४४७ बेड असून, ऑक्सिजनचे ३४०, व्हेंटिलेटरचे १४७, हायफ्लो नोझलचे ९६ बेड आहेत. रुग्णालयांनी तुटवडा लक्षात घेऊन नियोजन केल्याने अजून तरी कोणत्या रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याचा प्रकार समोर आलेला नाही, असेही ते म्हणाले.

चौकट

ऑक्सिजन प्लांटसाठी निविदा

महापालिकेच्या वतीने ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. महिन्याभरात हा प्लांट उभा राहू शकतो. १२५ जम्बो सिलिंडरची क्षमता असलेला हा प्लांट असेल. त्यासाठी कमी कालावधीची निविदा काढली आहे. सध्या मिरज कोविड सेंटरमध्ये तो उभा केला जाईल. कोरोनाचे संकट संपल्यानंतर तो कुपवाडमधील दोन रुग्णालयांसाठी वापरात आणता येणार असल्याचेही कापडणीस यांनी सांगितले.