शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पश्चिममध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सगळे एकत्र

By admin | Updated: September 13, 2016 00:50 IST

जिल्हा परिषद निवडणुका : मोर्चेबांधणीला वेग; काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील स्थानिक नेत्यांची भूमिका निर्णायक

सोमनाथ डवरी -कसबे डिग्रज --मिरज पश्चिम भाग इस्लामपूर मतदार संघाला जोडल्यापासून दोन विधानसभा निवडणुका झाल्या, पण या भागात जिल्हा परिषद निवडणुकीत अद्यापही माजी मंत्री जयंत पाटील यांना एकहाती सत्ता मिळालेली नाही. यंदा सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदामुळे ‘स्वाभिमानी’चे वजन वाढले आहे. त्यातच कॉँग्रेस, शिवसेनेसह सगळ्यांनीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अंतिमक्षणी जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विरोधक एकत्रित येण्याची चिन्हे आहेत. गतवेळी कसबे डिग्रज मतदार संघात जिल्हा परिषदेची जागा कॉँग्रेसला आणि पंचायत समितीची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. कवठेपिरान मतदार संघात भीमराव माने यांच्यामुळे राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. गेल्या पाच वर्षात मोठे बदल झाले आहेत. राज्यात सरकार बदलले आहे आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा जोरही ओसरला आहे. भाजपपेक्षा स्वाभिमानीचा जोर सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदाने वाढला आहे. त्याचप्रमाणे भीमराव माने शिवसेनेत गेल्याने कवठेपिरान परिसरात शिवसेना जोमात आहे, तर कॉँग्रेसमधील मदनभाऊ पाटील गट आणि विशाल पाटील गट एकत्र येतील, अशी स्थिती आहे.सद्यस्थितीत पश्चिम भागात राष्ट्रवादीने कितीही एकसंधता दाखवली तरी, चित्र वेगळे आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. परिसरात कॉँग्रेस-स्वाभिमानीची आघाडी होण्याची चिन्हे आहेत. कारण पूर्वाश्रमीचे कॉँग्रेसजनच ‘स्वाभिमानी’चे काम करताना दिसत आहेत.निवडणुकीत तालुका-जिल्हा पातळीवर काम करणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे, श्रीपाल चौगुले, राष्ट्रवादीचे अजयसिंह चव्हाण, मोहनराव देशमुख, कुमार लोंढे, शिवसेनेचे भीमराव माने, राष्ट्रवादीचे वैभव पाटील (समडोळी), रवींद्र माणगावे (सावळवाडी), अरुण साळुंखे, विलास आवटी (दुधगाव), भास्कर पाटील (तुंग), तसेच वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे, स्वाभिमानीचे कुमार पाटील (मौजे डिग्रज) या स्थानिक नेत्यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या गटात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आरक्षण कोणते असणार आणि उमेदवार कोण याची चर्चा सुरु आहे.