शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पंचायत समिती सभेत सेस निधीसाठी सदस्यांची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

ओळ : मिरज पंचायत समितीच्या सभेत सेस निधीच्या मागणीसाठी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मिरज : सेस फंड थकल्याने ...

ओळ : मिरज पंचायत समितीच्या सभेत सेस निधीच्या मागणीसाठी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मिरज : सेस फंड थकल्याने आक्रमक झालेल्या सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांसमोर हक्काचा निधी मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. पंचायत समितीला मिळालेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा व निधी खर्चाबाबत उदासीनता असल्याचा आरोप करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुक्यात महसूल वाढला असताना या उत्पन्नावर आधारित पंचायत समिती सदस्यांना मिळणारा सेस निधी तीन वर्षांपासून मिळालेला नाही. हक्काचा निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी अशोक मोहिते यांनी सभेस उपस्थित मुख्य लेखाधिकारी महेश औताडे यांच्याकडे केली. यावेळी किरण बंडगर, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, दिलीपकुमार पाटील, सतीश कोरे यांच्यासह महिला सदस्यांनी घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाल्यानंतर सेसची रक्कम मिळेल, असे औताडे यांनी सांगितले. पंधराव्या वित्त आयाेगाचा सुमारे एक कोटीहून अधिक निधी पंचायत समितीला मिळाला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सदस्यांना विकासकामांसाठी निधी मिळाला नाही, याचा जाब विक्रम पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला. कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत समन्वय नसल्याबाबत अशोक मोहिते, विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सदस्यांचा कालावधी संपल्यावर निधी उपलब्ध करणार काय, असा जाबही सदस्यांनी विचारला. उपसभापती अनिल आमटवणे यांनी हस्तक्षेप करीत पंधराव्या वित्तच्या निधी खर्चाचे तातडीने नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने वादावर पडदा पडला. एलईडी बल्ब खरेदी घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप दिलीपकुमार पाटील यांनी केला.

चौकट

म्हैसाळचे आवर्तन सुरू करा : विक्रम पाटील

कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने शासन निर्णयाप्रमाणे शेती व घरगुती वीज पुरवठा खंडित करू नये, तालुक्यात शेतीचा व पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर होत असल्याने शासनाने तातडीने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली.

चौकट

निकृष्ट रस्त्यांच्या चौकशीसाठी समिती

तालुक्यात सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची हाेत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. संबंधित कामाच्या चौकशीसाठी सदस्य व अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात येईल, असे उपसभापती अनिल आमटवणे यांनी सांगितले. रस्त्याच्या निकृ़ष्ट कामाबाबत आतापर्यंत झालेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याची सूचनाही आमटवणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केली.