शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मिरज कोविड रुग्णालयात दररोज आठ हजार लिटर ऑक्सिजनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णसंख्या कमी होत असली तरी अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णसंख्या कमी होत असली तरी अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त असल्याने अद्यापही दररोज आठ हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत रुग्णालयात ऑक्सिजनची गरज केवळ दोन हजार लिटरने कमी झाली आहे. मिरज सिव्हिलला दररोज कोल्हापूर व पुण्यातून ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे.

कोविड साथीमुळे मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाल्याने गरीब रुग्णांची सोय झाली आहे. मिरज कोविड रुग्णालय एप्रिल ते जुलैपर्यंत भरले होते. येथे सुमारे ३५० रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडची सोय आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शंभर व्हेंटिलेटर बेडना अखंड ऑक्सिजन पुरवठा आवश्यक आहे. कोविड रुग्णालय सुरू झाल्यानंतर प्रत्येकी सहा हजार किलो लीटर क्षमतेच्या तीन ऑक्सिजन टाक्या येथे बसविण्यात आल्या. एप्रिलपासून सुरू झालेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने दररोज दहा हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरू होता. जूनपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने दररोज आठ हजार लीटर ऑक्सिजनचा वापर सुरू आहे. रुग्णसंख्या कमी झाली तरी अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यकता असल्याने ऑक्सिजनचा वापर केवळ दोन हजार लीटरने कमी झाला आहे..

जिल्ह्याचे कोविड सेंटर असल्याने येथे व्हेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्‌वासासाठी द्रवरुप ऑक्सिजनचा दुप्पट वापर होतो. ऑक्सिजनची मागणी कायम असल्याने दररोज टँकरने पुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर बंद झाली आहेत. मात्र, मिरज सिव्हिलमध्ये ऑक्सिजनची गरज कायम असल्याचे चित्र आहे. एप्रिल व मे महिन्यात तुटवडा असल्याने ऑक्सिजन पुरवठा अनियमित होता. आता अन्यत्र मागणी कमी असल्याने पुरवठा सुरळीत आहे.

चाैकट

हवेपासून ऑक्सिजन निर्मिती प्लांटची उभारणी

मिरज सिव्हिलच्या आवारात हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लांटची उभारणी व चाचणी पूर्ण झाली आहे. ऑक्सिजन प्लांटपासून रुग्णालयापर्यंत पाईप जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्लांट कार्यरत होणार आहे. या प्लांटमधून सिव्हिलला दररोज १२५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले.