शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिरज हायस्कूलचा वाद न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2015 00:10 IST

महापौरांच्या निर्णयाला विरोध : महासभेत जाब विचारण्याची तयारी

सांगली : मिरज हायस्कूलच्या अध्यक्ष पदाचा वाद वाढतच चालला आहे. महापौर विवेक कांबळे यांनी बेकायदेशीररित्या अध्यक्ष पदावर हक्क सांगितल्याचा दावा करीत माजी अध्यक्ष बसवेश्वर सातपुते यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे, तर महापौरविरोधी गटाने महासभेत कांबळे यांना जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मिरज हायस्कूलवर महापालिकेचे नियंत्रण आहे. या हायस्कूलच्या स्कूल कमिटीवर पालिकेच्या नगरसेवकांची वर्णी लावली जाते, तर महापौर हे स्कूल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. काही अपवाद वगळता महापौरांव्यतिरिक्त अन्य नगरसेवकांकडे अध्यक्षपद दिले जाते. फेब्रुवारी महिन्यात महापौर निवडीवेळी विवेक कांबळे व बसवेश्वर सातपुते यांच्यात चुरस होती. पण कांबळे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी बसवेश्वर सातपुते यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मिरज हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे अध्यक्षपद दिले होते. गेले अकरा महिने सातपुते अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळत आहेत. आठ दिवसांपूर्वी सातपुते यांची उचलबांगडी करून महापौर कांबळे यांनी अध्यक्ष पदाची धुरा स्वत:कडे घेतली. पण त्याची माहिती सातपुते यांना नव्हती. या कमिटीतील सदस्य अतहर नायकवडी, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे यांनाही अध्यक्ष बदलाबाबत धक्का बसला. दरम्यान, महापौरांच्या या निर्णयाविरोधात सत्ताधारी गटात असंतोष पसरला आहे. सातपुते यांना अध्यक्ष पदावरून हटविण्याचा ठराव करण्यात आलेला नाही. त्यावर सत्ताधारी गटात कोणतीही चर्चा झालेली नाही. असे असताना सातपुते यांना हटवून महापौरांनी अध्यक्षपदाची सूत्रे कशी हाती घेतली, असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबत सातपुते यांनी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. महापौरविरोधी गटाने तर महासभेत कांबळे यांना जाब विचारण्याची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी) तडजोडीसाठी सारे काही!मिरज हायस्कूलमध्ये शिक्षक भरतीचा वाद न्यायालयात गेला होता. हा वाद तडजोडीने मिटविण्यात आला. या शिक्षकांना कामावर हजर करून घेण्यात आल्याचे समजते. त्यात मोठा अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोपही सत्ताधारी गटातून होऊ लागला आहे. त्यासाठी महापौरांनी ऐनवेळी सातपुते यांची उचलबांगडी करून स्वत:कडे अध्यक्षपद घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.