शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘मायणी बँक’ बिनविरोध!

By admin | Updated: June 16, 2016 01:07 IST

सुरेंद्र गुदगे गटाची सत्ता कायम : शेवटच्या दिवशी सचिन गुदगे गटाचे आठ अर्ज मागे

मायणी : मायणी अर्बन बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उच्च न्यायालयात सुनावणीसाठी असलेले सचिन गुदगेंसह २३ जणांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर उर्वरित अर्ज बुधवारी मागे घेतल्याने अत्यंत उत्सुकता लागलेली बॅँकेची निवडणूक अखेर बिनविरोध झाल्यामुळे सत्ताधारी सुरेंद्र गुदगे गटाची सत्ता कायम राहिली.दि मायणी अर्बन बॅँकेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन गुदगे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. तो ही आपल्या थोरल्या बंधूंच्या विरोधातच.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरेंद्र गुदगे व सचिन गुदगे यांचे दोन स्वतंत्र राजकीय गट तयार झाले. निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या वेळी दोन्ही गटांकडून हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी काणे यांनी सचिन गुदगेंसह २३ जणांचे अर्ज अवैध ठरविले. तद्नंतर त्यांनी आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर आयुक्तांनी हा निर्णय कायम केल्यानंतर त्यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही ठिकाणच्या निर्णयाचा अभ्यास करून बुधवारी उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी व आयुक्तांना निर्णय कायम करीत सचिन गुदगेंसह २३ जणांचे अर्ज अवैध ठरविलेला निर्णय कायम केला.बुधवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या वेळी सचिन गुदगे गटाच्या सहा जणांचे आठ अर्ज शिल्लक होते. ते ही अर्ज सचिन गुदगे व कार्यकर्त्यांनी मागे घेतल्यामुळे १७ जागांसाठी १७ अर्ज शिल्लक राहिल्यामुळे ही निवडणूक बुधवारी बिनविरोध झाली. सत्ताधारी सुरेंद्र गुदगे यांच्याकडे पुन्हा एकदा मायणी अर्बन बॅँकेची सूत्रे गेली आहेत. (वार्ताहर)