शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’साठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: December 1, 2015 00:10 IST

सुमनताई पाटील : ढालगावमध्ये अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक

ढालगाव : दुष्काळी भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, तसेच टेंभू योजनेला लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून निधीची तरतूद करण्यास भाग पाडू, असे आश्वासन आमदार सुमनताई पाटील यांनी दिले.ढालगाव (ता, कवठेमहांकाळ) भागातील अडीअडचणी सोडविण्यासाठी व दुष्काळी पाहणी दौरा आमदार पाटील यांनी केला. यावेळी ढालगाव येथे बोलताना त्या म्हणाल्या की, या भागातील जनतेचा महत्त्वाचा पाणीप्रश्न आहे. या भागास टेंभू योजनेतून पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटून ही योजना पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी तात्काळ मिळावा, अशी मागणी करणार आहे. विविध खात्यांचे पदाधिकारी यांचा ताफा त्यांच्याबरोबर असल्याने काही प्रश्न त्यांनी जागेवरच सोडविले. ढालगाव येथे जिल्हा बॅँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के म्हणाले की, या भागातील प्रश्न सोडवायचे असतील तर प्रथम शरद पवार, अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटून टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. ढालगाव येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे.यावेळी आर. आर. आबा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील यांनी, चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, शेतीपंपाचे वीज बिल माफ व्हावे, कृषी विमा मिळावा, शेतकऱ्यांना शेततळी मिळावीत, अशा विविध मागण्या केल्या. आ. पाटील यांनी शेळकेवाडी, आरेवाडी, चोरोची, दुधेभावी, ढोलेवाडी, चुडेखिंडी, जांभुळवाडी, निमज, कदमवाडी असा दौरा केला.बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, उपसभापती जगन्नाथ कोळेकर, माजी सभापती सुरेखाताई कोळेकर, राधाबाई हाक्के, कल्पना घागरे, स्वामी बापू, खुटाळे, तम्मन्ना घागरे, महादेव वाघमारे, नीलम घागरे, उज्ज्वला साबळे, विशाल खोळपे उपस्थित होते. (वार्ताहर) दुष्काळ तीव्र : उपाययोजनांची गरजतालुक्यात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. नोव्हेंबरमध्येच तीव्र पाणी टंचाई आहे. पुढील पाऊस येईपर्यंत सध्या उपलब्ध पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळ पाणी योजना सुरू करून तालुक्यातील तलाव वेळोवेळी भरून घेण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर करून टंचाईतून उपाययोजना राबविण्याची गरज आहे. याबाबतही चर्चा करणार असल्याचे आमदार सुमनताई पाटील यांनी यावेळी सांगितले.महावितरणच्याकारभाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारीगेल्या तीन दिवसांपासून आमदार सुमनताई पाटील यांचा तालुक्यात विभागवार दौरा सुरू आहे. दौऱ्यात विविध शासकीय कार्यालयांबाबतच्या तक्रारी त्या ग्रामस्थांकडून समजून घेत आहेत. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी ‘महावितरण’च्या कारभाराबाबत असल्याचे दिसून आले.