शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात नगराध्यक्ष. उपनगराध्यक्ष पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST

शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठीची निवडणूक शुक्रवार दि. ११ डिसेंबर रोजी होत असून नगराध्यक्ष पदासाठी ...

शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठीची निवडणूक शुक्रवार दि. ११ डिसेंबर रोजी होत असून नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधकाम सभापती सुनीता निकम, प्रतिभा पवार यांच्यापैकी कोणाची तरी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्ष पदासाठी दि. ७ डिसेंबरला सकाळी १० ते २ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. छाननी त्याचदिवशी दुपारी २ नंतर हाेईल. अर्ज माघारीची मुदत दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत असेल. यानंतर आवश्यक असल्यास दुपारी १२ नंतर लगेच निवडणूक होणार आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यानंतर लगेचच छाननी, उमेदवारी अर्ज माघार व आवश्यकता भासल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदाचीही निवडणूक होणार आहे.

२५ नोव्हेंबर रोजी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील यांनी, तर १ डिसेंबर रोजी नगराध्यक्षा अर्चना शेटे यांनी, पक्षाने दिलेला कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला आहे. नगराध्यक्षपद महिला राखीव आहे. त्यामुळे दोन इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये सुनीता निकम व प्रतिभा पवार यांना प्रत्येकी दहा महिने कार्यकाळ देण्याचे याअगोदरच ठरले आहे. त्यामुळे बांधकाम व शिक्षण सभापती सुनीता निकम, प्रतिभा पवार यापैकी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी विजय दळवी, गौतम पोटे, संजय हिरवडेकर यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबतही उत्सुकता आहे.