शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील मटका एजंट भूमिगत

By admin | Updated: November 11, 2014 00:03 IST

दुकाने बंद : वातावरण स्वच्छ होण्याची प्रतीक्षा--लोकमतचादणका

विटा : खानापूर तालुक्यासह विटा शहरात खुलेआम सुरू झालेला मटका ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच शहरातील मटका बुकींसह एजंटही भूमिगत झाले आहेत. नव्या जोमाने सुरू झालेल्या मटका व्यवसायाबद्दल गढूळ वातावरण झाल्याने काही दिवस मटका बंद ठेवण्याचे तोंडी फर्मान काढण्यात आले असल्याचे वृत्त आहे. परंतु, हे फर्मान कोणी काढले? हा विषय मात्र आजही गुलगुस्त्यातच आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नव्या सरकारचा शपथविधी पार पडताच, गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला कल्याण-मुंबई मटका भर चौकात आला. या व्यवसायाला कायद्याच्या रक्षकांनीच प्रतिष्ठा मिळवून दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. हा व्यवसाय नव्या दमाने सुरू झाल्याने मटका बुकी व एजंट यांच्यात फिलगुडचे वातावरण होते. विटा शहरासह खानापूर तालुक्यात मटका सुरू झाल्याची माहिती कानोकानी मिळताच, गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायातून निवृत्ती घेतलेल्या काही एजंटांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी फिल्डिंग लावून, मुख्य मटका बुकींशीही हातमिळवणी केल्याचे समजते.परंतु, कल्याण-मुंबई मटका एजंटांनी बस्तान बसविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिध्द करताच मटका बुकींसह एजंटांतही मोठी खळबळ उडाली. आज, सोमवारी अनेक मटका एजंटांनी आपली खोकी बंद ठेवून भूमिगत होणे पसंत केले. आज, सोमवारी विटा शहरातील आडवी पेठ, नेवरी नाका, खानापूर नाका, चौंडेश्वरी चौक, मायणी रस्ता या ठिकाणच्या प्रमुख पाच बुकींची खोकी बंद होती. याबाबत माहिती घेतली असता, विटा शहरासह तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या मटका उद्योगाबाबत रविवारपासून वातावरण गढूळ झाल्याने वातावरण स्वच्छ होईपर्यंत काही दिवसांसाठी मटका बुकी व एजंटांनी मटका व्यवसाय बंद ठेवण्याचे तोंडी फर्मान काढले असल्याचे, नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर एका नागरिकाने सांगितले. दरम्यान, गढूळ वातावरण स्वच्छ होईपर्यंत मटका उद्योग बंद ठेवण्याचे फर्मान कोणी काढले? याबाबत माहिती मिळू शकली नाही. (वार्ताहर)