शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘हुतात्मा’कडून १५ टक्के वेतनवाढ

By admin | Updated: October 18, 2016 00:56 IST

वैभव नायकवडी यांची घोषणा : त्रिपक्षीय समितीचा निर्णय

वाळवा : साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या त्रिपक्षीय करारानुसार हुतात्मा साखर कारखान्याच्या कायम व हंगामी कामगारांच्या वेतनामध्ये आॅक्टोबरपासून १५ टक्के वेतनवाढ केल्याची घोषणा अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली.ही वेतनवाढ देणारा राज्यातील ‘हुतात्मा’ साखर कारखाना हा पहिला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी दि. ४ जुलै १६ रोजी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये महाराष्ट्र शासन साखर संघ व कामगार प्रतिनिधींचा समावेश होता. या बैठकीनंतर वेतनवाढ निश्चित करण्यात आली. त्यानुसार करारनामाही करण्यात आला. या करारानुसार कारखान्याच्या हजेरी पत्रकावर असलेले हंगामी व कायम कामगारांना ‘हुतात्मा’ने १५ टक्के वाढ सध्याच्या आॅक्टोबर पगारातून देण्याची घोषणा सोमवारी कारखाना कार्यस्थळी झालेल्या कामगारांच्या गेटवरील बैठकीत करण्यात आली.दि. १ जुलै २०१५ पासूनची फरकाची एकूण १७ महिन्यांची रक्कम ही करार समाप्तीचे मुदतीपर्यंत देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी सांगितले. या वेतनवाढीचा लाभ कारखान्यातील ४३३ कामगारांना होणार आहे. यावेळी कारखाना कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, वित्त व्यवस्थापक दिलीप पाटील, जनरल मॅनेजर (केन) दीपक पाटील, अकौंटंट भागवत आव्हाड, सिव्हिल अभियंता जयवंत शिंदे, उत्पादनाचे बी. एस. माने, वर्क्स मॅनेजर अनिल पाटील, लेबर आॅफिसर अजित माळी उपस्थित होते. (वार्ताहर)वाळवा येथे ‘हुतात्मा’चे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी वेतनवाढीची माहिती दिली. यावेळी नरेंद्र कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.