शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार

By admin | Updated: December 8, 2015 00:32 IST

रघुनाथ पाटील : म्हैसाळ योजनेची थकबाकी सात-बारावर चढू देणार नाही

सांगली : दुष्काळी भागातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी, त्यांच्यावर अन्याय होत असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढवू देणार नाही, असे सांगत, हा प्रकार त्वरित न थांबल्यास खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.पाटील पुढे म्हणाले, म्हैसाळ योजनेची थकबाकी पूर्णपणे शासनाने भरणे आवश्यक असताना, प्रशासनाने मात्र ही थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची कार्यवाही चालू केली आहे. थकबाकी वसुलीचा हा पर्याय अजब असून, यात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जाणार आहेत. मुळात या योजनेची लादण्यात आलेली थकबाकी ही मनमानी पध्दतीने आकारण्यात आल्याने, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही थकबाकी भरु नये. यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आल्यास शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. तरीही प्रशासनाने थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविल्यास, खासदारांच्या घरावर संघटनेच्यावतीने मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उसाच्या ‘एफआरपी’बाबत ते म्हणाले, कोणताही कायदा नसताना केवळ परिपत्रकाच्या आधारे एक टन उसाला ४ हजार कर सरकार घेते. परंतु, एफआरपीबाबत कायदा असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. एफआरपी कारखानदारांना बंधनकारक करावी. यासाठी निधीची तरतूद कशी करावयाची हा सरकारचा प्रश्न असून, एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाकडून जाहीर झालेला सातवा वेतन आयोग देण्यात येऊ नये. कारण हा आयोग देऊन, ऐतखाऊंना पोसण्याचे काम शासन करणार आहे. वेतन आयोग लागू करण्यास संघटनेचा विरोध राहील. (प्रतिनिधी)शर्यतीवरील बंदी उठवा : उद्या मिरजेत बैठकगोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्यात यावा, बैलगाडी, घोडागाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, यांसह सर्व मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने बुधवार, दि. ९ डिसेंबरला मिरज येथील किसान चौकात सभेचे आयोजन केले असून, या सभेस देशातील शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित राहणार असल्याचेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.