शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माळ बंगला पंप हाऊस बंद पाडले!

By admin | Updated: July 24, 2014 23:11 IST

नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : शुध्दीकरण न करताच पाणी; पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला

सांगली : शहराला अनेक दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर आज (गुरुवार) महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांच्यासह पाच ते सहा नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी थेट माळ बंगल्यावरील महापालिकेच्या पाणी शुध्दीकरण केंद्राला भेट दिली, त्यावेळी पंप हाऊस दोनमधून शुध्दीकरण न करताच शहराला पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांना बोलावून घेऊन याचा जाब विचारला. त्यानंतर या पंपहाऊसचे काम बंद पाडले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सांगली व कुपवाड शहराला गढूळ, मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत आंदोलने सुरू असून, नागरिकांच्याही अनेक तक्रारी नगरसेवकांकडे आल्या होत्या. आज सकाळी अनेक नागरिकांनी महापालिकेत येऊन पाण्यासंदर्भात तक्रारी केल्या. यानंतर सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास महापौर कांबळे, उपमहापौर मजलेकर, नगरसेविका मृणाल पाटील, पुष्पलता पाटील, वंदना कदम, नगरसेवक पांडुरंग भिसे आदींनी महापालिकेतून थेट माधवनगर रस्त्यावरील माळ बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी पंप हाऊस दोनमधून शहराला शुध्दीकरण न करताच थेट पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांना बोलावून घेतले. यावेळी पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून शुध्दीकरण केंद्र बंद असून, क्लोरीन व तुरटी टाकून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने नदीवरील पंपाने पावसाचे पाणी थेट पंप हाऊसमध्ये येत आहे. यामुळे शहराला गढूळ व मातीमिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. पदाधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करूनच शहराला पाणी पुरवठा करण्याचे आदेश पाटील यांना दिले. त्यानंतर पंप हाऊस दोनमधून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. येत्या दोन दिवसांत याची दुरुस्ती करून शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती पाणी पुरवठा अधिकारी सुनिल पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)आयुक्तांकडे तक्रार करणार यावेळी उपमहापौर पाटील, मजलेकर म्हणाले की, शहराला अपुरा पाणी पुरवठा चालेल; मात्र गढूळ पाणी पुरवठा नको. पाणी पुरवठा विभागाने यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत आम्ही आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रार करण्यास गेले होतो; मात्र ते बाहेर गेले होते. उद्या ते आल्यानंतर त्यांच्याकडे तक्रार करणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबत सत्तारूढ गटाचे नेते मदन पाटील यांच्याकडेही तक्रार करण्यात आली.४अशुध्द पाण्याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया