शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मदनभाऊंचा असंगाशी संग

By admin | Updated: June 28, 2015 23:14 IST

मोहनराव कदम : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनुभव गाठीशी असताना, मदन पाटील यांनी पुन्हा असंगाशी संग केला आहे. एकदा फसवणूक होऊनही पुन्हा त्याच मार्गाने ते चालले आहेत, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी मदन पाटील आम्हाला सोडून जयंत पाटील यांच्या पॅनेलमध्ये गेले. ते फसविणारे लोक आहेत, असे आम्ही त्यांना सांगत होतो. तरीही त्यांनी काँग्रेसला सोडून असंगाशी संग केला. त्यानंतर निवडणुकीत प्रत्यक्ष फसवणुकीचा अनुभवही त्यांनी घेतला. त्यामुळे ते आता आपली चूक सुधारतील, असे वाटत होते. पण अनुभव गाठीशी असूनही त्यांनी पुन्हा तीच चूक केली आहे. त्यांच्या अशा निर्णयाने आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लढलो, त्याच पद्धतीने पुन्हा मैदानात उतरणार आहोत. समविचारी लोकांना एकत्रित करून आम्ही लढत देऊ. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही चांगली लढत दिली होती. अपेक्षेपेक्षा चांगले यश आम्हाला मिळाले होते. बाजार समितीसाठीही चांगली तयारी झाली आहे. अजितराव घोरपडे आमच्याबरोबर आहेत. त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. अन्य काही नेतेही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. मदन पाटील यांनी एकदा केलेली चूक पुन्हा केल्यामुळे त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची प्राथमिक तयारी आम्ही केलेली आहे, अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)