शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इंधन, गॅस दरवाढीविरोधात मदनभाऊ युवा मंचाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरात भरमसाट वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरात भरमसाट वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. याविरोधात विश्रामबाग चौकात मदनभाऊ युवा मंचाच्या वतीने साखरवाटप करून केंद्र सरकारचा अनोखा निषेध करण्यात आला.

युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लेंगरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असूनही आपल्या देशात भाजप सरकारच्या राज्यात तेलाच्या किमतीही कमी होताना दिसून येत नाहीत. यामागचे गौडबंगाल काय? दैनंदिन वापरातील घरगुती गॅस काँग्रेस सरकारच्या काळात ४१० रुपये झाल्यावर भाजप पक्ष रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत होता. आता त्यांच्या सत्ताकाळात घरगुती गॅस ८०० रुपयांवर गेल्यानंतरही त्यांची तोंडे गप्प आहेत. भाजप सरकारने महागाई कमी करावी, अन्यथा सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने उपरोधात्मक असे साखरवाटप आंदोलन केल्याचे सांगितले.

या वेळी दिनेश सादिगले, अजय पवार, सुजीत लकडे, सचिन माने, शंकर माने, अक्षय दोडमनी, महेश पाटील, शीतल लोंढे, शेखर पाटील, महेश कोळी, सागर पवार, प्रवीण निकम, महेश कर्णे, अमोल झांबरे, मयूर बांगर, तोफिक कोतवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.