सांगली : निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असून, या काळात बँकांमधील एक लाखापेक्षा अधिक रोख स्वरूपात होणाऱ्या व्यवहारावर प्रशासनामार्फत नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँक प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे यांनी आज (गुरुवारी) येथे केले. जिल्ह्यातील बँक प्रतिनिधींची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. बर्डे पुढे म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये लाखापेक्षा जास्त रोख स्वरूपात व्यवहार झाल्यास त्याची संपूर्ण माहिती निवडणूक कार्यालयाने दिलेल्या विहीत नमुन्यातील प्रपत्रात भरून ती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. ही माहिती बँकांनी सादर न केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. बँकांनी शाखांमध्ये मतदान जागृतीसाठी संबंधित पोस्टर्स, बॅनर्स दर्शनी भागात लावावीत. (प्रतिनिधी)मतदार नोंदणीसाठी नव्याने १५ हजार अर्जनिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १७ सप्टेंबरअखेर राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात नवीन मतदारांचे १५ हजार १९ मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात १ आॅगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधित राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात दिलेल्या १५ हजार १९ मतदारांमध्ये ८ हजार २३६ पुरुष, तर ६ हजार ७८३ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात १ आॅगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधित ही नोंदणी करण्यात आली. या अर्जांची आता छाननी करुन त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे.
लाखांवरच्या व्यवहारावर नजर
By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST