शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रावर पुन्हा लॉकडाऊनचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर ...

सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर शहरातील गर्दी वाढत आहे. दोन दिवसांत रुग्णसंख्या कमी न आल्यास महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी दिला.

महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपर्यंत पाेहोचल्याने लॉकडाऊनचे सावट गडद झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अद्याप सुरू असून, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तिसऱ्या स्तरातील नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढली आहे. चारपर्यंत वेळ असतानाही अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत दुकाने सुरू राहत असल्याने गर्दीही कायम राहत आहे. यामुळेच पॉझिटिव्हिटी रेटही २० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत चालली आहे. सरासरी दोनशेवर रुग्ण सापडत असून पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे. राज्यात एकीकडे कोरोनाला उतार लागला असताना महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढतच चालल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार रुग्णसंख्या कमी न आल्यास चौथ्या स्तरातील निर्बंध महापालिका क्षेत्रात लागू करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

चौकट

नियम पाळा, अन्यथा निर्बंध

कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नसून दुसरी लाट सुरूच आहे. दोन-तीन दिवसांपासून महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढती आहे. कोरोनाचे नागरिकांना गांभीर्य नसल्याचे चित्र असून नियमांचे पालन हाेताना दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील शिथिलता बंद करून कडक निर्बंध लागू करण्यात येतील. गर्दी टाळावी, तसेच लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.