शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

क्षणात जुळल्या ऋणानुबंधाच्या गाठी!

By admin | Updated: January 2, 2017 23:31 IST

अनोखी गळाभेट : इस्लामपूरचे डांगे अन् मध्य प्रदेशातील पाटीदार कुटुंबाचा स्नेह

युनूस शेख ल्ल इस्लामपूरकाही नाती दोन क्षणांच्या भेटीतही दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात. अशाच ऋणानुबंधाच्या गाठी साखराळेमधील संपतराव डांगे आणि मध्य प्रदेशातील पानसेमल येथील जयंतीराम पाटीदार यांच्यामध्ये जोडल्या. मध्य प्रदेशात शाळेत शिपाई असलेल्या पाटीदार यांचे ४0 हजार रुपयांचे हरवलेले पाकीट डांगे यांनी परत केले आणि हे बंध जुळले. डांगे कंपनीच्या कामासाठी मध्य प्रदेशाला गेले होते. या प्रवासात बस खरगोण येथे पोहोचल्यावर डांगे यांनी तेथे अर्धा तास वाट पाहिली. शेवटी ते चालू लागले. तेवढ्यात जयंतीराम पाटीदार समोर आले. त्यांनी डांगे यांना विचारले ‘पानसेमलसे जो बस आई, वो कहाँ रुकी है? असे विचारले. डांगे यांनी बसस्थानकाच्या पलीकडील बाजूला बस थांबल्याचे सांगितले. पाटीदार तेथून निघाले. मात्र डांगे यांनी त्यांचा हात पकडून ‘क्या काम है, बोलो ना भैय्या,’ असे विचारले, तर पाटीदार काही सांगायला तयार नाहीत. पुन्हा जायला निघाले. मात्र डांगे यांनी हात सोडला नाही. मग पाटीदार यांनी पैशाचे पाकीट हरवल्याचे सांगितले.डांगे यांनी पाकीट त्यांचेच असल्याची खात्री केली आणि ते त्यांच्या हातात ठेवले. पाटीदार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा लागल्या. पाटीदार तेथील शाळेत शिपाई आहेत. घराचे बांधकाम आणि मुलीचे लग्न यासाठी त्यांनी ही रक्कम जमा केली होती. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. संपकर् ासाठी कोणताच पर्याय नव्हतासंपतराव डांगे इस्लामपूरमधील राजाराम सॉल्व्हेक्समध्ये काम करतात. कंपनीच्या कामानिमित्त ते मध्य प्रदेशात गेले होते. ते पानसेमल-खरगोण बसमधून प्रवास करत होते. त्याच बसमध्ये पाटीदारही होते. खरगोणच्या अलीकडे पाटीदार बसमधून उतरले. मात्र त्याचवेळी त्यांचे ४0 हजार रुपये असलेले पाकीट बसमध्येच पडले. दरम्यान, डांगे यांनी आसन सोडून पाटीदार बसलेल्या पुढच्या आसनावर बॅग ठेवली. बॅग ठेवताना त्यांना पैशाचे पाकीट दिसले नाही. बसल्यावर नजरेस पाकीट पडले. त्यांनी ते पाहिले असता, त्यामध्ये नव्या दोन हजारांच्या २0 नोटा होत्या. पाकिटात पैशांशिवाय, संपर्क करावा, असा एकही कागद नव्हता.