शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पन्नासवर कृषी केंद्रांचे परवाने रद्द

By admin | Updated: May 20, 2016 00:08 IST

कृषी विभागाची कारवाई : विक्री बंदचे आदेश

सांगली : कृषी विभागाच्यावतीने गुणवत्ता नियंत्रण अंतर्गत केलेल्या बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीत दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील ४९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २७ कृषी औषध विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. ६६ केंद्रांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. खरीप व रब्बी हंगामाबरोबरच इतरवेळी शेतकऱ्यांना कृषी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके योग्य दरात व दर्जेदार मिळावीत यासाठी नियोजन केले जाते. हंगामाच्या पूर्वी जिल्ह्यातील खते, बियाणांचा आढावा घेऊन, दोष आढळलेल्या कृषी औषध केंद्रांवर कारवाई केली जाते. बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीसाठी प्रत्येकी ११ जणांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील कृषी औषध दुकानांच्या तपासणीत दोष आढळलेल्या दुकानांवर निलंबनासह विक्री बंदची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात बिायाणांचे दोन उत्पादक व १३८६ विक्रेते आहेत. रासायनिक खतांचे २० उत्पादक व १९६० विक्रेते, तर कीटकनाशकांचे ३ उत्पादक व १७८७ विक्रेते आहेत. यांचे मार्चअखेर बियाणांचे ६०२ नमुने घेण्यात आले. लक्षांक म्हणून ६०४ नमुने घेण्यात आले होते. रासायनिक खतांचे ३६२ नमुने घेण्याच्या लक्षांकापोटी ४४७, तर कीटकनाशकांच्या १४५ लक्षांकाच्या पोटी १५४ नमुने तपासण्यात आले आहेत. तपासणी करण्याचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. या पथकाने मार्च २०१६ अखेर जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची तपासणी करून कार्यवाही केली आहे. ४९ परवाने निलंबित केले आहेत. खरीप हंगाम सुरु होण्यास थोडाच अवधी शिल्लक असतानाच, कृषी विभागाने दोषी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)