शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

खाती गोठविण्यासाठी बँकांना पत्रे

By admin | Updated: October 31, 2014 23:47 IST

पतसंस्था घोटाळा : पाटीलच्या जामिनावर आज निर्णय

सांगली : जिल्हा परिषदेच्या आवारातील अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये सुमारे १२ कोटी २६ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब पाटील (रा. सांगली) याच्यासह पाचजणांची बँकेतील खाती गोठविण्यासाठी शंभरहून अधिक बँकांना लेखी पत्र पाठवून सूचना केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी दिली. दरम्यान, पाटीलने केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर उद्या (शनिवार) निर्णय होणार आहे.अण्णासाहेब पाटील याच्यासह लिपिक गणपती शिंदे, अकौंटंट बाळासाहेब पाटील, लिपिक अजितकुमार पाटील (रा. नांद्रे, ता. मिरज), शिपाई विष्णू माळी (रा. गव्हर्मेंट कॉलनी, सांगली) या पाचजणांविरुद्ध चार दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेची कारवाई टाळण्यासाठी पाटीलने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर आज होणारा निर्णय न्यायालयाने उद्यापर्यंत (शनिवार) पुढे ढकलला आहे. पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी २००३ ते ३१ मार्च २०१० पर्यंत पतसंस्थेतून बोगस कर्जे उचलली. त्याचबरोबर ठेवीदारांच्या ठेवी परस्पर हडप करून एकूण १२ कोटी २६ लाख ७३ हजार २९६ रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आला आहे. संशयितांनी अपहारातील रक्कम ही बँकेत ठेवली असण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातील शंभरहून अधिक बँका व काही पतसंस्थांशी लेखी पत्राद्वारे संपर्क साधला आहे. संशयितांची बँक खाती असतील तर तातडीने गोठवून त्याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. पाचही संशयितांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकले. मात्र गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागल्याने संशयित घराला कुलूप ठोकून पसार झाले आहेत. (प्रतिनिधी)