शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गदिमा स्मारक वर्षात पूर्ण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:58 IST

करगणी : गदिमांच्या जन्मभूमीत जन्मशताब्दी वर्षातच सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे परिपूर्ण स्मारक पूर्णत्वाकडे नेणार असून, आटपाडीत नाट्यगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले. ते शेटफळेतील गदिमा पारावरील साहित्य मेळाव्यात बोलत होते.शेटफळेतील २३ व्या गदिमा पारावरील साहित्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार बाबर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा इंगोले होते.यावेळी ...

करगणी : गदिमांच्या जन्मभूमीत जन्मशताब्दी वर्षातच सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे परिपूर्ण स्मारक पूर्णत्वाकडे नेणार असून, आटपाडीत नाट्यगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले. ते शेटफळेतील गदिमा पारावरील साहित्य मेळाव्यात बोलत होते.शेटफळेतील २३ व्या गदिमा पारावरील साहित्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार बाबर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा इंगोले होते.यावेळी आमदार बाबर म्हणाले, गदिमा हे अभिजात लेखक, कवी होते. ते साहित्यातून राजकारणात आलेले होते. त्यामुळे शासनाला व प्रशासनाला विनंती करणार आहे की, गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष हे चांगल्या पध्दतीने साजरे व्हायला हवे. गदिमांचे आचार, विचार, साहित्य सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिपूर्ण असे स्मारक उभारणार आहे. गदिमांचा साहित्य वारसा नवीन पिढीने जोपासला आहे. माणदेशातले साहित्य अजरामर ठेवण्याचे काम केले आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करा.यावेळी डॉ. कृष्णा इंगोले म्हणाले की, गदिमांच्या विचारधारा जीवन समृध्द करणाऱ्या माणसाचे जीवन मांडणारे आहे. या व्यासपीठाने अनेक नामवंत साहित्यिक घडवले आहेत. अपूर्ण स्मारक पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. संभाजी गायकवाड, प्रा. सी. पी. गायकवाड यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.नाट्यगृह उभारणारआटपाडीमध्ये गदिमांच्या नावे नाट्यगृह उभारणार असून, याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. जागेचा शोध सुरू आहे. लवकरच मार्ग निघेल. नाट्यगृहाबरोबरच गदिमा स्मारकाचे अर्धवट काम पूर्ण करणार असल्याचे आ. अनिल बाबर यांनी सांगितले.आ. अनिल बाबर वमान्यवरांच्या हस्ते प्रा. संभाजी गायकवाड यांच्या ‘चुकलेलं पाऊल’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनिल बाबर यांनी किमान स्मारकाबाबत तरी माझी पावले चुकणार नाहीत, अशी ग्वाही देत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा विश्वास दिला.