येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यशवंतराव मोहिते रयत पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते, मलकापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, भारती बँकेचे संचालक जितेश कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, आदित्य मोहिते, शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, यशवंतराव मोहिते व पतंगराव कदम यांच्या वारसांना सभासदत्व मिळविण्यासाठी वारसा हक्काने झगडावे लागत असेल तर सर्वसामान्यांचे काय? ही निवडणूक राजकारण व सत्तेसाठी लढवायची नाही तर सभासद हा कारखान्याचा मालक बनून त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी लढवायची आहे.
मलकापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, लोकशाहीत मतदानापासून वंचित ठेवले त्यांना जाब विचारायची संधी मतदानातून आली आहे. यावेळी अपक्ष उमेदवार प्रमोद पाटील यांनी रयत पॅनलला पाठिंबा दिला. डॉ. सुधीर जगताप, प्रा. अनिल जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पाटील यांनी स्वागत केले. गोपाल पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव पाटील यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, राष्ट्रवादीच्या छायाताई पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम खबाले, कडेगाव पंचायत समितीचे सदस्य विकास पवार, कराड पंचायत समितीचे सदस्य उत्तमराव पाटील, राजारामबापूचे संचालक दादासाहेब मोरे, अमोल पाटील, सुरेंद्र पाटील, हणमंतराव पाटील, गुलाबराव पाटील उपस्थित होते.
फोटो : १८ शिरटे १
ओळ : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनोहर शिंदे, डॉ. इंद्रजित मोहिते, रघुनाथ कदम, जितेश कदम उपस्थित होते.