शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाने पानमळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST

नरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ...

नरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढता राहिल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. याशिवाय पानांच्या फुटव्यांवरही परिणाम झाला आहे. किमान २१ दिवसांनी येणारा पानवेलीचा खुडा महिन्यावर जाऊन पोहोचला आहे.

पानवेल ही एक संवेदनशील वनस्पती असून, पानांवर हवामानातील बदलाचा सतत परिणाम जाणवत असतो.

पावसाळ्यात पाणी जास्त झाल्यास पानगळ होऊन मूळकुजव्या येतो. थंडीत पानांचा फुटवा बंद पडतो. उन्हाळ्यात मात्र उन्हाचा झळांमुळे पानवेल करपून पाने काळी पडतात.

साधारणपणे पानवेली २५ ते ३० अंशांपर्यंत तग धरून राहतात. मात्र सध्या स्थिती पाहता उन्हाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाऊ लागल्याने पाने करपू लागली आहेत. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान पान उत्पादकांना सोसावे लागत आहे.

दरम्यान, करपलेल्या खाऊच्या पानांना पानबाजारपेठेत कवडीमोल किमतीला मागणी होत आहे. उन्हाचा पारा असाच वाढत राहिला तर पानवेलीची बुंध्यालगतची गोलाकार कडी वाळून पानवेल कोमेजणार आहे.

सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नरवाडला ८० हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड झाली आहे. या सर्व क्षेत्रापैकी उन्हांमुळे किती क्षेत्र तग धरून राहते हे आता काळच ठरविणार आहे.

याबाबत पान उत्पादक शेतकरी मधुकर जाधव यांना विचारले असता, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच चालल्याने पानमळ्यांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

चाैकट

हीे काळजी घ्या

उन्हाळ्यात पानमळ्याला पाणी शक्यतो

वाफ्याने चार दिवसांच्या अंतराने द्यावे. पानमळ्याला उन्हाच्या झळांपासून

संरक्षण मिळण्यासाठी शेडनेटच्या तटबंदी ऐवजी उसाचा पाला वापरावा. उन्हाळ्यात रसायनांचा वापर अजिबात करू नये. पानवेलींचे संतुलित तापमान ठेवण्यासाठी किमान उन्हाळ्यापुरते तुषार सिंचनाचा वापर करावा, अशी माहिती मिरज कृषी विभागाचे कृषी सहायक राजू रजपूत यांनी दिली.